Kairiche Lonche Recipe In Marathi : उन्हाळा आला की, साठवणीचे पदार्थ करायची लगबग सुरु होते. एक किलो पापड, किलोभर लोणचं करायची हौस अनेकांना असते. बाजारात मिळणाऱ्या आंबट-गोड लोणच्याची तुलना घरच्या झणझणीत व चविष्ट लोणच्याशी होऊच शकत नाही आणि म्हणूनच कदाचित हा खटाटोप केला जात असावा. तर आज आपण एक किलो कैरीचे लोणचं कसे बनवायचे याची सोपी रेसिपी पाहणार आहोत…
साहित्य (Kairiche Lonche Ingredients)
- एक किलो कैरी
- दोन चमचे मीठ
- एक चमचा हळद
- दालचिनी, लवंग, राई
- दोन वाट्या तेल
- चार चमचा तिखट मसाला
- तीन चमचे मीठ
- हळद
कृती (How To Make Kairiche Lonche)
- एक किलो कैरी आणा आणि स्वच्छ धुवून घ्या.
- त्यानंतर पुसा आणि बारीक तुकडे करून घ्या.
- त्यानंतर दोन चमचे मीठ आणि एक चमचा हळद कैरीच्या तुकड्यांवर लावा.
- रात्रभर टोपलीत किंवा कापडावर ठेवा.
- दुसऱ्या दिवशी दालचिनी आणि लवंग भाजून घ्यायचे.
- राईची डाळ भाजून घ्यायची
- नंतर दालचिनी, लवंग, राई मिक्सरला बारीक करून घ्यायचे.
- दोन वाट्या तेल गरम करून घ्या.
- तेल थंड झाल्यावर मिस्करमध्ये बारीक घेतलेला मिश्रण आणि चार चमचा तिखट मसाला, तीन चमचे मीठ, हळद टाका.
- त्यानंतर बारीक करून घेतलेली कैरीचे तुकडे त्यात घाला.
- मिक्स करून घ्या थोडं मिश्रण हलवून घ्या.
- सकाळी पुन्हा मिक्स करून घ्या असे दोन ते तीन दिवस करा.
- पाणी अजिबात घालू नका आणि मग काचेच्या बरणीत ठेवून द्या.
तर अशाप्रकारे तुम्ही झटपट लोणचं अगदी घरच्या घरी बनवू शकता.