काही पदार्थ असे असतात, की जे त्यांच्या मूळ रूपात खाण्यापेक्षा त्यांचं मूळ रूप बदलून, त्यात काहीतरी कलाकुसर करून खाण्यातच मजा असते. कुरडयांची भाजी हासुद्धा असाच एक हेवेखोर प्रकार. कुरडया करण्यासाठी मेहनत घ्यायची, त्या करायच्या, वाळवायच्या, साठवायच्या आणि तळून नुसत्या खाण्याच्या ऐवजी भिजवून त्यांची भाजी करायची. कुरडयांचा जळफळाट होणं स्वाभाविकच आहे ना! आज हीच भाजी शिकूया.

कुरडईची भाजी साहित्य

  • ६ कुरडया कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवाव्यात
  • ३ कांदे बारीक कापावे
  • १/४ चमचा हळद, दीड चमचा तिखट
  • १ चमचा तेल
  • तुमचा जिर अर्धा चमचा मोहरी चिमूटभर हिंग
  • चवीनुसार मीठ थोडीशी साखर

कुरडईची भाजी कृती

स्टेप १
कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरी जिऱ्याची खमंग फोडणी करून त्यामध्ये कांदा टाकावा व तो लालसर परतावा

स्टेप २
त्यामध्ये हळद तिखट मीठ साखर घालून छान परतावी व पाण्यातून कुरडया घालून त्या मिक्स कराव्या व छान परताव्या झाकण ठेवून दोन मिनिटं मंद गॅसवर छान वाफ येऊ द्यावी

हेही वाचा >> खानदेशी पद्धतीने करा झणझणीत मिक्स उसळ; भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवी ही रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टेप ३
भाजी छान परतून एकजीव करावी. अजून दोन मिनिटं छान झाकण ठेवून वाफ काढावी व गरम गरम चपाती बरोबर भाकरीबरोबर खायला द्या खूप टेस्टी व सुंदर अशी भाजी तयार होते