Besan Ladoo Recipe: दिवाळी म्हटलं की, फराळ आणि फराळातील सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे ‘लाडू.’ फराळात बेसन, रवा लाडू हमखास केले जातात. तर आज आम्ही तुम्हाला एक खास लाडूची रेसिपी सांगणार आहोत, ज्याचे नाव आहे ‘बेसन लाडू.’ फराळाचे ताट समोर आले की आपण त्यातून हमखास सर्वात आधी बेसनाचा लाडू उचलतो. बेसनाचे लाडू म्हटल्यावर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. हे बेसनाचे लाडू अगदी परफेक्ट झाले तर लाडूचा डब्बा अगदी झटपट रिकामी होतो. पण तेच फराळाचा कोणताही पदार्थ फसला की तो खायला नकोसे वाटते. बेसनाचे लाडू हे घरांतील सगळ्यांच्याच आवडीचे असल्यामुळे ते परफेक्ट बनवलेच पाहिजे, याची मोठी जबाबदारी गृहिणीवर असते. परंतु असे असले तरीही लाडू बनवताना आपण काही बेसिक लहान – सहान चुका करतोच. ज्यामुळे अथक प्रयत्न करुनही लाडू फसतात. असे होऊ नये म्हणून बेसनाचे लाडू परफेक्ट बनवण्यासाठी काही खास टिप्स नक्की वाचा.

बेसन लाडू साहित्य

बेसनाचे लाडू बनवण्यासाठी १ किलो बेसन घ्या. त्यात फक्त १ किलो साखर मिसळावी लागते. तुपाचे प्रमाण ७०० ते ८०० ग्रॅम ठेवावे. ७-८ चमचे रवा घ्या. बेसन घट्ट असेल तर रवा घालू नये. चवीपुरते ड्रायफ्रुट्स.

बेसन लाडू कृती

  • बेसनाचे लाडू बनवण्यासाठी बेसन चांगले भाजणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यासाठी एक जड भांडे घेऊन त्यात बेसन आणि तूप घाला.
  • बेसन भाजताना सुरुवातीला गॅस वर ठेवा आणि नंतर बेसन ढवळत असताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. बेसन जसजसे भाजत जाईल तसतसे तुपामुळे ते पातळ होईल.
  • बेसन तपकिरी होईपर्यंत चांगले तळून घ्यावे. गॅसच्या आचेवर काळजी घ्या, जास्त आचेवर तळल्याने बेसन जळून जाईल.
  • बेसन भाजल्यावर गॅस बंद करा आणि ढवळत राहा. तव्याच्या उष्णतेमुळे बेसन खालून जळू शकते. हवे असल्यास ते थंड करण्यासाठी दुसऱ्या भांड्यात काढून घ्या.
  • आता रव्यात थोडं तूप घालून तळून घ्या. बेसनाच्या पिठात मिसळा. भाजलेले बेसन थंड झाल्यावर बेसन गाळून त्यात घाला. त्यात चिरलेले काजू आणि बदामही मिसळा.
  • हे मिश्रण चांगले मिसळा. आता यातून तुमच्या आवडीचे लाडू बनवत रहा. चवदार बेसनाचे लाडू तयार आहेत.
  • काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवा. बेसनाचे लाडू १५-२० दिवस खराब होत नाहीत.

खूप मऊ झाले असतील तर

जर बेसनाचे खूप मऊ झाले असतील तर प्रथम ५ ते १० मिनिटे थंड करा . मिश्रण थंड झाल्यावर तूप घट्ट होण्यास मदत करेल. उरलेले पिस्ते, बदाम आणि वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांनी लाडू सजवा. हे लाडू ७ दिवसांपेक्षा जास्त चांगले राहत नाहीत. म्हणून त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. यावेळी चांगल्या प्रतीचे तूप वापरण्याचा प्रयत्न करा.

बेसन पिठात गुठळ्या राहू नये म्हणून

बेसन पिठात गुठळ्या राहू नयेत म्ह्णून लाडू बनवण्यासाठी बेसन भाजताना ते सतत चमच्याने ढवळत राहावे. यामुळे बेसन पिठात गुठळ्या राहत नाहीत. एवढे करून सुद्धा गुठळी राहिलीच तर एक पेला घेऊन त्याच्या पृष्ठभागाने दाब देत पिठातील गुठळ्या मोडून घ्याव्यात.

लाडू खाताना तो टाळूला चिकटू नये म्हणून

लाडू खाताना काहीवेळा बेसन आपल्या टाळूला चिकटते, बेसन व्यवस्थित भाजले गेले नाही तर असे होते. यामुळे लाडू बनवताना बेसन व्यवस्थित भाजून घ्यावे. बेसन भाजताना जर ते व्यवस्थित भाजले गेले नाही तर ते टाळूला चिकटते. गॅसच्या मंद आचेवर चमच्याने सारखे ढवळत राहून बेसनाचा खरपूस भाजल्याचा जोपर्यंत सुगंध येत नाही तोपर्यंत बेसन भाजून घ्यावे.

भाजलेले बेसन पातळ होऊ नये म्हणून

गरम भाजलेल्या बेसनामध्ये साखर, तूप किंवा पाक अगदी लगेच घातल्यास हे जिन्नस लगेच विरघळतात आणि बेसनचे मिश्रण पातळ होते. यामुळे लाडू नीट बांधता येत नाहीत. त्यामुळे असं अजिबात करू नका. आधी बेसनाला थोडं थंड होऊ द्या त्यानंतरच त्यात साखर, तूप किंवा पाक घालावा

लाडू नीट बांधता येत नसतील तर

लाडू बांधत असताना बेसन थोडे गरमच असू द्यावे. यामुळे लाडू पटापट बांधले जातात व त्यांचा आकार व्यवस्थित एकसारखा येण्यास मदत होते. बेसन जास्त थंड होऊ देऊ नका. अगदी थंड बेसनात पाक मिसळल्याने मिश्रण व्यवस्थित तयार होत नाही आणि लाडू बांधताना ते विखुरले जातात. लाडू नीट बांधता येण्यासाठी मिश्रणात थोडं तूप गरम करून नीट मिसळा यामुळे लाडू सहज बांधले जातील.

लाडू बनवल्यानंतर ते कडक होऊ नयेत म्हणून

गरम बेसन पिठात पाक घालून मिक्स केले तर ते पातळ होते आणि नंतर थंड झाल्यावर त्यापासून लाडू बनवले तर ते घट्ट होऊन थोडे कडक लाडू बनू शकतात. याउलट लाडू बनवून ते दीर्घकाळ टिकण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवले तरी ते कडक होतात. त्यामुळे बेसन पिठात पाक मिसळून घेताना बेसन पीठ एकदम थंड किंवा गरम नसून ते साधारणतः मध्यम गरम असावे.