Potato Cheese Sandwich : लहान मुलांना सँडविच खूप आवडतं. अनेकदा पालक मुलांना बाहेरचे सँडविच खाऊ घालतात पण हे सँडविच आरोग्याच्या दृष्टीने तितके चांगले नसतात. पालकांनो, जर तुमच्या मुलांनाही सँडविच आवडत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी घरीच सँडविच बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला पोटॅटो चीज सँडविच कसे बनवायचे, याविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या.

साहित्य :-

  • ब्रेड
  • बटाटे
  • चीज
  • बटर
  • मीठ
  • चाट मसाला

हेही वाचा : हेही वाचा : चमचमीत डाळ वांगे कधी खाल्ले का? एकदा खाल तर खातच राहाल, नोट करा ही सोपी रेसिपी

कृती :

  • ब्रेडच्या स्लाईसला बटर लावा.
  • बटाटे उकळून घ्या.
  • बटाट्याच्या चकत्या पाडा
  • बटाट्याच्या चकत्या ब्रेडच्या स्लाईसवर लावा.
  • त्यावर चीज, मीठ आणि चाट मसाला टाका.
  • आणि त्यावर दोन ब्रेड स्लाइस ठेवा.
  • त्यानंतर त्रिकोणी आकारात ब्रेड स्लाइस कापा
  • हे सँडविच तुम्ही सर्व्ह करण्यापूर्वी तव्यावर तेल किंवा तूप टाकून भाजू शकता.