Tiranga Rasgulla Recipe: १५ ऑगस्टला आपल्या सभोवतीचं वातावरण देशभक्तीनं भारलेलं असतं. मनातून आनंद ओसंडून वाहात असतो. हा आनंद मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना भेटून , कुठेतरी छान भटकायला जाऊन साजरा केला जातो. आनंदाचा विषय आला की खाण्याचा विचार महत्त्वाचा असतो. या दिवशी काहीतरी स्पेशल करायचं मनात असतंच. तुम्हालाही ‘काय करायचं बरं स्पेशल?’ असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आहे आमच्याकडे. ते काय? तीरंगा रसगुल्लाची ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे.
तिरंगा रसगुल्ला साहित्य
- ४ कप दूध
- १ चमचा पांढरा व्हिनेगर
- १ १/२ कप साखर
- ३ कप पाणी
- काही थेंब व्हॅनिला किंवा गुलाब पाणी
- काही थेंब हिरवा आणि केशरी खायचा रंग
तिरंगा रसगुल्ला बनवण्याची कृती –
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- तिरंगा रसगुल्ला बनवण्यासाठी सर्व प्रथम एक जड तळाचा पॅन घ्या आणि त्यात दूध उकळा. दुधाला उकळी आल्यावर आच कमी करून त्यात व्हिनेगर टाका आणि मिक्स करा.
- जेव्हा दूध फाटून त्यातील पाणी वेगळे झाल्यावर मलमलच्या कापडाने किंवा चाळणीने गाळून घ्या आणि छेनावर थंड पाणी टाका, जेणेकरून व्हिनेगरचा वास दूर होईल.
- आता छेनामधील पाणी पूर्णपणे काढून टाका. आता छेनाला तोपर्यंत मॅश करा जोपर्यंत ते गुळगुळीत होऊन एकत्र तयार होत नाही. यासाठी तुम्हाला सुमारे १०-१२ मिनिटे लागू शकतात.
- आता छेनाचे ३ भाग करा. एका भागात खाण्याचा केशरी रंग आणि दुसऱ्या भागात हिरवा रंग घाला. आता प्रत्येक भाग घेऊन रसगुल्ल्याच्या आकाराचा छोटे छोटे गोळे बनवा.
हेही वाचा – Vegetable Dalia recipe: नाश्त्यासाठी बनवा व्हेजिटेबल दलिया, टेस्ट सोबत मिळेल पोषण!
- आता एका जड तळाच्या पॅनमध्ये साखर आणि पाणी उकळवा. साखरेचा पाक तयार करा. आता त्यात तयार केलेले गोळे टाका. पॅन झाकून १० ते १५ मिनिटे शिजवा. नंतर गॅस बंद करा. तुमचा चविष्ट तिरंगा रसगुल्ला तयार आहे. तुम्ही त्यांना थंड सर्व्ह करू शकता.