How To Make Winter Special laddoo : खूप भूक लागल्यावर काय खावं हे आपल्याला सुचतं नाही. अशावेळी आपण दुकानातून १० ते १५ रुपयांचे चिप्स, बिस्कीट पुढे विकत आणतो किंवा घरी खायला आहे का हे डब्यात किंवा फ्रिजमध्ये शोधू लागतो. असं करण्यापेक्षा सोपा उपाय म्हणजे प्रोटिनयुक्त आहार घेणे. या भुकेच्यावेळेस खाण्यासाठी तुम्ही लाडू बनवू शकता. पण, हा लाडू बेसन, रवा किंवा बुंदीचा नसून हरभरा, गुळापासून हिवाळ्यात बनवा पौष्टीक लाडू (Winter Special laddoo). चला पौष्टीक लाडू बनवण्यासाठी साहित्य, कृती काय लागेल जाणून घेऊया…

साहित्य (Winter Special laddoo):

  • हरभरे पाव किलो
  • पाव किलो गूळ
  • एक वाटी सुखं खोबरं
  • एक वाटी काजू, बदाम
  • एक वाटी तूप

हेही वाचा…Moong Dal Pakode: १ वाटी मूग डाळीचे करा कुरकुरीत पकोडे; झटपट बनेल हेल्दी, टेस्टी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती (How To Make Winter Special laddoo) :

  • हरभरे भाजून घेऊन त्याच्या साल काढून घ्या.
  • त्यानंतर जात्यावर किंवा मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.
  • पाव किलो गूळ किसून घ्या आणि बारीक करून त्यात घाला.
  • एक वाटी सुखं खोबरं भाजून त्यात घाला.
  • एक वाटी काजू, बदाम भाजून घ्या आणि बारीक करून त्यात घाला.
  • एक वाटी तूप गरम करुन त्यात घाला.
  • नंतर मिश्रण पुन्हा एकदा बारीक करून घ्या आणि मग लाडू वळून घ्या.
  • अशाप्रकारे तुमचे स्पेशल लाडू तयार (Winter Special laddoo).

हिवाळा आरोग्यदायी ऋतू असल्यामुळे तब्येत नीट राहण्यासाठी घरोघरी पौष्टिक लाडू बनवले जात आहेत. यासाठी गृहिणी नवनवीन लाडूंचे प्रकार घरी बनवून पाहत असतात. तर आज आपण हरभरा, गूळपासून पौष्टीक लाडू कसे बनवायचे हे पाहिलं (Winter Special laddoo) . तुम्ही हा लाडू सकाळी नाश्त्याबरोबर, दुपारी भूक लागल्यावर किंवा रात्री काहीतरी गोड खावंसं वाटलं तर तुम्ही हा लाडू खाऊ शकता. दुकानातून विकतचे पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही हे पौष्टीक लाडू बनवून ठेवू शकता आणि दररोज एक खाऊ शकता.