सध्या सगळीकडे स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. स्वातंत्र्यदिन हा देशाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या राष्ट्रीय सणाला गोडधोड काय करावे, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर यावर्षी तुम्ही खव्याचे गुलाबजाम बनवू शकता. अनेकदा आपण खव्याचे गुलाबजाम खरेदी करुन खातो पण या स्वातंत्र्यदिनाला तुम्ही खव्याचे गुलाबजाम घरीच बनवू शकता. त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा

साहित्य

  • खवा
  • रवा
  • रोझ इसेन्स
  • साखर
  • खायचा सोडा

हेही वाचा : Daalmethi : पौष्टीक असलेली डाळमेथीची भाजी वाढवेल तुमच्या जेवणाचा स्वाद, एकदा करून पाहाच

कृती

  • सुरुवातीला खवा पुरणयंत्रातून काढा.
  • त्या नंतर त्यात रवा आणि सोडा मिक्स करा आणि चांगल्याने मळा.
  • साखरेत पाणी घाला आणि कच्चा पाक तयार करा
  • त्यानंतर या पाकमध्ये रोझ इसेन्स घाला.
  • वरील गोळे तुपात किंवा तेलामध्ये तळा
  • आणि त्यानंतर पाकात टाका.
  • गोळे पाकात टाकताना पाक गरम असावा.
  • गोळे मऊ मुरल्यानंतर तुम्ही हे खव्याचे गुलाबजाम सर्व्ह करू शकता.