Fried Potato Recipe: संध्याकाळी चहासोबत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्यासाठी पर्याय शोधत आहात. मग बटाटयाची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे उत्तम. अवघ्या ५ मिनिटांमध्ये झटपट तयार होणारा हा नाश्ता तुम्ही बटाटे, देशी मसाले, आणि कोथिंबीर वापरून तयार करु शकता. या पदार्थ तुम्ही चहा किंवा कॉफीसोबत सर्व्ह करू शकता. याची चव सर्वांना नक्की आवडेल. बटाट्याची रेसिपी टेस्टी आहेच तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ कसे तयार करावी?
फ्राइड मसाला बटाटा बनवण्यासाठी साहित्य
२०० ग्राम छोटे बटाटे साली सकट
१ छोटा चमचा लाल मिर्ची
१ छोटी वाटी कोथिंबिर
१ छोटा चमचा काळी मिर्च पावडर
२ मोठे चमचे लिंबाचा रस
४ हिरवी मिर्ची
नमक आवश्यकतेनुसार
पाणी आवश्यकतेनुसार
१छोटा चमचा चाट मसाला
१ छोटा चमचा आमचूर पावडर
हेही वाचा : उन्हाळ्यात घ्या कोल्ड कॉफीचा आनंद! कशी तयार करावी, जाणून घ्या ५ टिप्स
फ्राइड मसाला बटाटा तयार करण्याची पद्धत
ही सोपी रेसिपी तयार करण्यासाठी सर्वात आधी बटाटे धूवून साफ करा आणि वेगळे ठेवा.
एक पॅन घ्या, त्यामध्ये तेल टाका आणि भरपूर तेल गरम होऊ द्या त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि आलू या सर्व टाका आणि चांगले एकत्र करा.
बटाटा तपकिरी रंगाचा झाल्यावर त्यात काळी मिर्ची, लाल मिर्ची पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर, कोथिंबिर, लिंबाचा रस आणि हिरवी मिर्ची टाका. त्यामध्ये मिठ टाका. बटाट्याला परतून घ्याआणि सॉससोबत सर्व्ह करा.