khandeshi chicken rassa recipe: ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या, त्यालाच अनुरूप झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. अशीच एक झणझणीत रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहोत. चला तर पाहुयात आज खान्देशी स्पेशल चिकन रेसिपी. हे खान्देशी पद्धतीचं चिकन तुम्ही एकदा खाल तर खातच रहाल. चला तर पाहुयात याची सोपी रुचकर रेसिपी.

खान्देशी चिकन रस्सा साहित्य

  • १/२ किलो चिकन
  • १ कांदा बारीक चिरलेला
  • १/२ टिस्पून हळद
  • मसाल्यासाठी
  • ४ कांदे
  • ८/९ लाल मिरच्या
  • १०० ग्रम सूके खोबर
  • १/२ टिस्पून खसखस
  • ३-४ काळी मिरी
  • ३-४ बारीक तुकडे दालचिनी
  • २-३ लवंग
  • १ बारीक तमालपञ
  • ७-८ टेबलस्पून तेल
  • कोथिंबीर
  • ४ टेबलस्पून कांदालसूण मसाला
  • ४ टेबलस्पून चिकन मसाला
  • ४-५ लसुण पाकळ्या
  • १ टेबलस्पून मीठ

खान्देशी चिकन रस्सा कृती

स्टेप १
सर्वप्रथम आपण खालील प्रमाणे पातेल्यात २ टेबलस्पून तेल टाकुन, बारीक चिरलेला कांदा, १/२ टिस्पून हळद टाकुन चिकन शिजवून घेणे.

स्टेप २
आता आपण ताजा मसाला बनवू. खाली दाखवलेले सर्व जिन्नस एका कढाईत छान खमंग लालसर भाजून घेऊ या आणि थंड झाले कि मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. आणि मसाला बारीक वाटून झाल्यावर, कांदालसूण मसाला टाकून परत मिक्सरला फिरवून घ्या.

स्टेप ३
आता पातेल्यात तेल तापवून घ्या, त्यामधे ऐक तमालपत्र टाका, नंतर वाटलेला मसाला छान तेल सुटे पर्यत परतून घ्या. त्यानंतर चिकन मसाला, चवी नुसार मीठ आणि शिजवलेले चिकन टाकून १० मिनीट शिजवून घ्या. झाले आपले खान्देशी चिकन रस्सा तयार.

हेही वाचा >> कोकणातील अस्सल पारंपारिक गोड पदार्थ मोकल; एकदा खाल तर खातच रहाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


टिप : जर रस्सा पातळ झाला असेल तर पंढरपुरी डाळ तव्यावर भाजुन मिक्सर मध्ये बारीक करून नंतर थोडे पाणी टाकुन रस्सा मध्ये टाकावे.