Garlic Chutney Easy Recipe: चटणीमुळे जेवणाचा स्वाद वाढतो. आपण सहसा शेंगदाण्याची चटणी, टोमॅटोची चटणी, चिंचेची चटणी, नारळाची चटणी, डाळीची चटणी घरी बनवतो पण तुम्ही कधी लसणाची चटणी घरी बनवली आहे का? लसणाची चटणी ही अत्यंत पौष्टिक आणि चवीला स्वादिष्ट असते. लसणाची चटणी सहसा वडापाव, डोसा किंवा पराठाबरोबर खातात. जर तुम्हाला घरच्या घरी लसणाची चटणी बनवायची असेल तर ही सोपी रेसिपी नोट करा.आज आम्ही तुमच्यासाठी खानदेशी पद्धतीची झणझणीत चटकदार अशी लसूण चटणीची रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर पाहुयात रेसिपी.

खानदेशी पद्धतीनं लसणाची चटणी साहित्य

तेल- ४ ते ५ टिस्पून

मोहोरी- पाव टिस्पून

जीरं- पाव टिस्पून

धणे पावडर- अर्धा टिस्पून

कढीपत्ता- ८ ते १० पानं

काश्मिरी लाल मिरच्या- ५ ते ६

सुकं खोबरं- अर्धी वाटी

शेंगदाणे- पाव वाटी

लसूण- ३ ते ४ लसूण

१० हळद- अर्धा टिस्पून

११ मीठ – चवीनुसार

खानदेशी पद्धतीनं लसणाची चटणी रेसिपी

१. सगळ्यात आधी तेल गरम करून त्यात जीरं, मोहोरी, धणे पावडर, कढीपत्ता, तीळ आणि चिरलेली लाल सुकी मिरची परतवून घ्या. त्यात वाटीभर खोबरं घाला. खोबरं परतून झाल्यानंतर त्यात शेंगदाणे आणि लसूण घाला.

२. सकाळी भाजलेल्या लसणाची १ पाकळी खा; कोलेस्टेरॉल बाहेर निघेल-म्हातारपणातही निरोही राहाल

३. लसूण परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घाला आणि हे मिश्रण बारीक पावडर होईपर्यंत फिरवून घ्या. तयार आहे लसणाची कुरकुरीत चटणी.

४. ही चटणी तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. जर तुम्ही साधा वरण भात बनवला असेल तरीही तुम्ही तोंडी लावणीसाठी चटणी खाऊ शकता.

हेही वाचा >> खानदेशी पद्धतीने करा “डाळ गंडोरी” भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा ही रेसिपी

५. ही लसणाची चटणी तुम्ही वडापाव, डोसा किंवा पराठाबरोबर खाऊ शकता