स्वादिष्ट सामिष : दीपा पाटील
साहित्य
४ चिकन ड्रम स्टिक्स, १ चमचा आले-लसूण वाटलेले, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मिरपूड, अर्धा चमचा लिंबूरस, मीठ. तसेच आवरणासाठी पाव कप किसलेले चीज, २ चमचे मावा, ४ हिरव्या मिरच्या, पाव चमचा धने पूड, पाव कप काजू पूड.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
कृती -चिकन धुऊन त्याला वाटलेले आले-लसूण, चाट मसाला, मिरपूड, लिंबूरस आणि मीठ लावून तासभर ठेवा.आता चीज, मावा, हिरव्या मिरच्या, चाट मसाला, धने पूड आणि काजू पूड एकत्र करून मिक्सरला वाटून घ्या.ते मिश्रण चिकनला लावून घ्या. यानंतर चिकन फॉइलमध्ये गुंडाळून २४० अंश सेल्सिअसला ३० मिनिटे बेक करून घ्या. सव्र्ह करताना केशर व पिस्त्याचे काप घाला.