पावसाळ्यात अगदीच भरपेट जेवण करणे, योग्य नसते. कारण पावसाळ्यात पचनाच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यातही डिहायड्रेशन होऊ नये आणि शरीरात पोषणमुल्यांची कमतरता निर्माण होऊ नये, म्हणून भरपूर प्रमाणात सूप घ्यावे. सूप सेवन केल्यामुळे शरीरातील पाणी पातळीही संतूलित राहते आणि शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनमुल्येही मिळतात. चला तर मग आज चवळीचे सुप कसे बनवायचे ते पाहूयात.

चवळीचे सूप साहित्य

५० ग्रॅम चवळी
वेगवेगळ्या भाज्या
१/२ टेबलस्पून साजूक तूप
१ टीस्पून जीरे पावडर
१/२ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून मीरपुड
१ टीस्पून शेंदेमीठ

चवळीचे सूप कृती

१. प्रथम चवळी स्वच्छ धुऊन पाण्यात रात्रभर भिजत घातली. मग सकाळी पाणी निथळून त्यात हळद, मीठ व थोडे पाणी घालून कुकर मध्ये शिजवून घेतली.

२. शिजवलेली चवळी मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर फिरवून घेतली. मग त्यांमध्ये तूप गरम करून त्यात जिऱ्याची फोडणी करून मग चवळी चे मिश्रण ओतले.

३. मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात जिरेपूड, मिरेपूड, मीठ, लींबाचा रस व पाणी घातले. आणि चांगले उकळून घेतले.

हेही वाचा >> Palak Recipe: अनोख्या पध्दतीने ‘पालक फ्राय’ कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४. उकळलेले चवळीच्या सूप असे मिश्रण वाटी मध्ये काढून सर्व्ह केले.