सोयबीन हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामध्ये कित्येक व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्व असतात. शाकाहारी लोकांसाठी सोयबीन हा प्रोटीनच चांगला स्त्रोत मनला जातो. नॉनव्हेजसाठी पर्याय म्हणून देखील सोयाबीनचे सेवन केले जाते. सोयाबीनमध्ये फायबरसाठी देखील चांगला स्त्रोत मानले जाते. तुम्हाला तुम्हाच्या आहारात सोयाबीनचा समावेश करायचा असेल तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक सोपी रेसिपी आहे. तुम्ही सोयबीन करी बनवू शकता ज्याची चव उत्तम आहेत आणि झटपट तयार करता येते. एकदा ही रेसिपी नक्की बनवून पाहा. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी
सोयबीन करी रेसिपी
साहित्य : सोयाबीन दोन मोठे चमचे, कांदा १ लहान, लसूण, २ पाकळ्या, चवीसाठी गरम मसाला( स्वादानुसार) मीठ, फोजणीसाठी कढीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, तेल १ चमचा
हेही वाचा – एकदा देशी नूडल्स खाऊन पाहा, चायनिज नूडल्स विसरून जाल! जाणून घ्या गव्हाच्या शेवयांची सोपी रेसिपी
कृती : आदल्या रात्री सोयाबीन किमान ८-१० तास भिजवून घ्या. दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये सोयाबीन शिजवून घ्या. एक कढईत केल गरम करुन घ्या. जिरे कढीपत्ता, मोहरी, हिंग हळद, लाल तिखट याची फोडणी करुन घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण परतून करुन घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, लसून परतून घ्या आणि गरम मसाला घाला. मिक्षण एकत्रित हलवा आणि वाफेवर पाच मिनिटे परत शिजूवन घ्या.