Maghi Ganesh Jayanti 2024: बाप्पाला विविध वस्तूंचे नैवेद्य दाखवला जातो मात्र मोदक म्हटलं की गणपती बाप्पांचा सगळ्यात आवडता पदार्थ. गणपती बाप्पासोबतच आपल्याला सुद्धा मोदक खायला भरपूर आवडतात. महाराष्ट्रामध्ये विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकलेट, विविध रंगांचा वापर करून तयार केले जाणारे मोदक विशेष लोकप्रिय आहेत. गणेशोत्सवादरम्यान घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार केले जातात.

माघी गणेशोत्सव आपल्यापैकी अनेक जण साजरी करतात. या उत्सवादरम्यान साटोरी, पुरण पोळी, श्रीखंड आणि लाडू यांसारखे पदार्थ सर्रास खाल्ले जातात. पण या सणात मोदकांपेक्षा दुसरा कोणताच पदार्थ इतका लोकप्रिय नाही. आज माघी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जर आपण मोदक बनविण्याचा बेत आखला असेल तर रोजचे पारंपरिक उकडीचे मोदक करण्यापेक्षा झटपट बनणारे केशर मावा मोदक तयार करून पाहा…

केसर माव्याचे मोदक साहित्य

  • खवा
  • साखर
  • पिस्ता
  • वेलची पावडर
  • केशर
  • दूध

केसर माव्याचे मोदक कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • केसर माव्याचे मोदक बनवण्यासाठी एका भांड्यात दूध आणि साखर एकत्र करून बाजूला ठेवा.
  • आता एका नॉन-स्टिक पॅनमध्ये खवा ३ ते ४ मिनिटे भाजून घ्या.
  • मध्ये मध्ये ढवळत राहा. भाजल्यावर त्यात केशर दूध घालून मध्यम आचेवर २ मिनिटे राहूद्या.
  • माव्याचे मिश्रण नीट मिक्स करून प्लेटमध्ये काढून घ्या. आता हे मिश्रण थंड होऊद्या.
  • थंड झाल्यावर हाताने मॅश करा. त्यात बारीक केलेली साखर, वेलची पावडर आणि पिस्ता घाला.
  • नीट मिक्स केल्यानंतर मोदक बनवण्यासाठी साचा घ्या आणि त्यात तूप लावा.

हेही वाचा >> Palak Recipe: अनोख्या पध्दतीने ‘पालक भाजी’ कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी

  • आता त्यात मावा भरून नीट दाबून घ्या. मोदक साच्यातून काढा. सर्व माव्याचे मोदक त्याच पद्धतीने तयार करा. तुमचे केसर मावा मोदक तयार आहे