Maka Matar Dal Khichdi Recipe: आता हिवाळ्याची सुरूवात झाली आहे. थंडीत नेमकं काय बनवायचं हा प्रश्न पडतो. म्हणून आज आपण हिवाळा स्पेशल मका – मटार डाळ खिचडी रेसिपी कशी बनवायची ते जाणून घेणार आहेत.

साहित्य

  • 1 कप शिजवलेली तुर डाळ
  • 2 कप शिजवलेला बासमती तांदुळ
  • 2 टेबलस्पून तूप
  • 1 तेजपत्ता
  • 1 इंच दालचिनी
  • 1 मसाला वेलची
  • 1 टीस्पून जीरे
  • 1 टीस्पून मोहरी
  • भरपूर लसूण बारीक चिरून
  • 2 हिरव्या मिरच्या चिरून
  • आल बारीक चिरून
  • 2 कांदे बारीक चिरलेली
  • 1 टॉमेटो उभे चिरून
  • 1 कप वाफवलेले मक्याचे आणि मटार चे दाणे
  • 1 बटाटा उकडून
  • 1 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून धणे जीरे पूड
  • 1 टीस्पून हिंग
  • चवीनुसार मीठ आणि साखर
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

फोडनिकरता

  • 1 टेबलस्पून तूप
  • लसूण पाकळ्या ठेचून
  • 1 टीस्पून लाल तिखट

कृती

एका मातीच्या भांड्यात तूप गरम करून त्यात खडे मसाले घालून परतून घ्या.

मोहरी तडतल्यावर त्यात कडीपत्ता घाला. नंतर बारीक चिरलेला लसूण आणिआलं घालून परतून घ्या. नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.

आता टॉमेटो उभे चिरून घाला, सर्व मसाले घालून एकजीव करून घ्या.

शेवटी चवीनुसार मीठ आणि साखर घालून मिक्स करावे. आणि वाफवलेल्या भाज्या घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्या

आता शिजवलेली डाळ घोटून यात घाला आणि मिक्स करा.एक उकळी द्या, नंतर यात ठेचलेला लसूण पाकळ्या आणि लाल तिखट घालून खमंग फोडणी करून घ्या.

डाळ झाल्यावर शिजवेलेला भात घालून एकजीव करून घ्या.

एक उकळी द्या, नंतर यात ठेचलेला लसूण पाकळ्या आणि लाल तिखट घालून खमंग फोडणी करून घ्या.

तयार फोडणी खिचडी वर ओतून घ्या, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घ्या आणि गरमागरम खिचडी मस्त लिंबू पिळून सर्व्ह करा.

वरून अजून थोडी फोडणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता

मस्त अशी “हिवाळा स्पेशल मका – मटार डाळ खिचडी” नक्की करून पहा.