Soybean Kebabs Recipe: अनेकदा घरात बनवलेली सोयाबीनची भाजी लहान मुलं आवडीने खात नाहीत. अशावेळी तुम्ही सोयाबीनपासून बनवलेला कुठलातरी वेगळा टेस्टी पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. महिलांना नेहमी विविध पदार्थ ट्राय करायला आवडतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोयाबीन कबाब कसे बनवायचे हे सांगणार आहोत. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि हेल्दी आहे.

सोयाबीन कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

१. १/२ कप सोया चुरा
२. १/२ कप उकडलेली हरभरा डाळ
३. ४-५ बटाटे
४. ५-६ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
५. २ चमचे आलं-लसूण पेस्ट
६. १ चिमूट दालचिनी पावडर
७. १ चमचा धने पावडर
८. १ चमचा जिरे पावडर
९. १ चिमूट हिरवी वेलची पावडर
१०. तेल आवश्यकतेनुसार
११. मीठ चवीनुसार
१२. कोथिंबीर

सोयाबीन कबाब बनवण्याची कृती:

१. सर्वात आधी वरील साहित्य चांगले मिसळा आणि स्मॅश करा, नंतर हे व्यवस्थित चांगले मळून घ्या.

२.आता त्याचे लहान गोळे करुन त्याला कबाबचा आकार द्या.

३. त्यानंतर एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात कबाब टाका.

हेही वाचा: ‘चना जोर गरम भेळ’ संध्याकाळच्या भुकेसाठी परफेक्ट रेसिपी; नोट करा साहित्य आणि कृती

४. आता कबाब दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. तयार गरमागरम सोयाबीन कबाब सर्वांना सर्व्ह करा.