मखाणा खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.मखाणा हा पोषक तत्वांचा खजिना आहे.त्यात प्रोटीन, फायबर, मॅग्नेशिअम. पोटॅशिअम, फॉस्फरस आणि जीवनसत्वे आढळतात. वजन नियंत्रित करणाऱ्यांना मखाणा खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेक लोक मखाणा फक्त भाजून खातात, काही लोक भाजलेल्या मखाण्यामध्ये चाट मसाला तिखट मीठ टाकतात. या शिवाय आणखी एका पद्धतीने तुम्ही मखाणा खाऊ शकता. तुम्हाला काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल पण तुम्ही हेल्दी आहाराचा पर्याय शोधत असाल तर तुम्ही मखाणा भेळ बनवून खाऊ शकता. मखाणा भेळ तुमची चाट खाण्याची इच्छा पूर्ण करेल शिवाय तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करेल.

मखाणा भेळ

साहित्य
मखाणा -१ वाटी
चिरलेला कांदा – २
चिरलेला टोमॅटो – २
शेंगदाणे – १ वाटी
चिरलेली काकडी – १
शेव – १ वाटी
डाळिंबाचे दाणे – १ वाटी
तेल – १ चमचा
तिखट – १ चमचा
मीठ – चवीनुसार
चाट मसाला – १ चमचा
चिंचेची चटणी – २ चमचे
हिरवी चटणी – २ चमचे

हेही वाचा –१५ मिनिटांत झटपट बनवा ‘बटाट्याचे चविष्ट मोमोज’; नोट करा साहित्य आणि कृती

हेही वाचा – पौष्टिक आणि खमंग मेथी गाजर पराठा रेसिपी! कॅल्शियम भरपूर, हेल्दी-हटके रेसिपी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती
मखाणा तेल किंवा तूप टाकून भाजून घ्या कुरकुरीत होई पर्यंत भाजा.
त्यानंतर एका भांड्यात भाजलेला मखाणा काढा.
त्यात शेंगदाणे, चिरलेला कांदा-टोमॅटो टाका.
त्यानंतर बारीक चिरलेली काकडी आणि कोथिंबीर टाका.
अर्धा कप शेव टाका.
चिंचेची चटणी २ चमचे, पुदीना कोथिंबीरीची हिरवी चटणी २ चमचे टाका.
चवीनुसार मीठ टाका.
तुमची हेल्दी मखाणा भेळ तयार आहे.