Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात पोहे, उपमा खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही पौष्टिक नाश्त्यासाठी एक हटके पदार्थ करू शकता. तुम्ही मक्याचा चवदार असा उपमा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. झटपट होणारा हा पदार्थ चवीला अप्रतिम आणि तितकाच पौष्टिक आहे. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत कोणीही हा पौष्टिक असा नाश्ता कोणालाही आवडले. झटपट केलेला मक्याचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होतोच पण चवीला व पचायलाही खूप हलका असतो. तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मक्याचा उपमा कसा बनवायचा, तर त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

साहित्य

  • 2 वाटी मक्याचे दाणे
  • 2 कांदे मोठे बारीक कापलेले
  • 1 टेबल स्पून तेल
  • चवीनुसार मीठ
  • 1/2 चमचा हळद दीड चमचा तिखट
  • 1/2 चमचा मोहरी चिमूटभर हिंग
  • 1 लिंबाचा रस
  • 15 कढीपत्त्याची पाने थोडीशी कोथिंबीर धुऊन बारीक कापलेली

कृती

प्रथम थोडे थोडे करून मक्याचे दाणे मिक्सरमधून सरबरीत वाटून घ्यावे.

कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग, मोहरी व कडीपत्त्याची खमंग फोडणी देऊन त्यात कांदा घालून तो छान परतावा.

यामध्ये हळद तिखट मीठ घालून परतावे व वरील केलेला किस त्यामध्ये घालून छान परतावा व वाफेवर परतत शिजू द्यावा.

छान खरपूस परतून शिजला की त्यावर लिंबाचा रस व कोथिंबीर पेरून गरम गरम खायला द्यावा. हा उपमा अतिशय टेस्टी लागतो व पौष्टिकही आहे.

(नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आलेली आहे.)