Winter Special Manchow Soup: अनेकदा रेस्टॉरंटमध्ये आपण मंचाव सूप खाल्लेलं असतं. त्याची चव काय औरच असते. अनेकांच्या आवडीचं असलेलं हे मंचाव सूप नेहमीच बाहेरून विकत घेण्यापेक्षा किंवा बाहेर जाऊन खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अगदी झटक्यात बनवू शकता. याची चवदेखील अगदी रेस्टॉरंटमध्ये बनवलेल्या मंचाव सूपसारखीच स्वादिष्ट असेल. चला तर मग आज पाहूया घरच्या घरी मंचाव सूप कसे बनवायचे…

साहित्य

४-५ लसूणच्या पाकळ्या

आलं

हिरवी मिरची

अर्धी चिरलेला शिमला मिरची

एक वाटी चिरलेली कोबी

१ टेबलस्पून सोया सॉस

२ टेबलस्पून लाल तिखट सॉस

१ टेबलस्पून टोमॅटो सॉस

१ टेबलस्पून व्हिनेगर

अर्धा लिटर पाणी

२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर

रेसिपी (Manchow Soup Recipe)

  1. एका कढईत ४-५ बारीक चिरलेली लसूणच्या पाकळ्या, किसलेलं आलं आणि चिरलेली हिरवी मिरची टाका.
  2. त्यात चिरलेली कांदेपात, १ बारीक चिरलेला गाजर, अर्धी चिरलेला शिमला मिरची आणि एक वाटी चिरलेली कोबी टाका. तुम्हाला आवडेल अशी इतर भाज्या देखील टाकू शकता.
  3. सर्व छान परतून घ्या.
  4. त्यात १ टेबलस्पून सोया सॉस, २ टेबलस्पून लाल तिखट सॉस, १ टेबलस्पून टोमॅटो सॉस आणि १ टेबलस्पून व्हिनेगर टाका.
  5. अर्धा लिटर पाणी आणि कॉर्नफ्लोरची स्लरी (२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर आणि ५ टेबलस्पून पाणी) घाला.
  6. ५ मिनिटे उकळा.
  7. कांद्याची पात आणि तळलेले नूडल्स घालून सजवा.
  8. तुमचा हिवाळ्यातला खास मंचाव सूप तयार आहे. छान आस्वाद घ्या!

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Mansi Chaudhary (@khana_peena_recipe)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.