पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि अशा वातावरणात भजे किंवा पकोडे खाण्याचा वेगळाच आनंद असतो. त्यात मेथीचे बोंड म्हणजेच पकोडे विदर्भात मोठ्या आवडीने खाल्ले जातात. घरातील लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्ती देखील मेथीचे बोंड आवडीने खातात. मेथी ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तुम्ही जर हटके पण हेल्दी भजीच्या शोधात असाल तर तुम्ही मेथीच्या गोटा भजी ट्राय करू शकता.
मेथी साहित्य :
- प्रत्येकी एक वाटी चणा डाळ
- १ वाटी बारीक चिरलेली मेथी
- पाव वाटी रवा
- पाव वाटी दही
- मीठ
- २ ते ३ ओल्या मिरच्या
- जिरे अर्धा टी स्पून
- तेल
मेथी कृती :
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- सर्वात आधी मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून बारिक चिरून घ्या.
- त्यानंतर मिरच्या, आलं, लसूण एकत्र वाटून घ्या.
- बेसन पिठ भिजवून घ्या.
- त्यानंतर सगळं बेसणाच्या पिठामध्ये एकत्र करून घ्या.
- त्यामध्ये जिरं, कोथिंबीर, मीठ आणि रवा घालून एकत्र करा.
- कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये भजी तळून घ्या.
हेही वाचा – पावसाळ्यात एन्जॉय गरमागरम तंदुरी भुट्टा; एकदा खाल तर खातच रहाल!
- गरमा गरम भजी खाण्यासाठी तयार आहेत.
- चटणी किंवा सॉससोबत तुम्ही भजी खाऊ शकता.