Masale Bhaat Recipe : मसाले भात असा पदार्थ आहे जो लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आवडतो. लग्न असो किंवा कोणतेही मंगलकार्य जेवणामध्ये मसाले भात आवडीने केला जातो. अनेकांची तक्रार असते की महाप्रसादाच्या पंगतीत किंवा लग्नात पंगतीतील वाढला जाणारा चविष्ठ मसाले भात घरी बनवता येत नाही. तुम्हाला असंच वाटतं का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण घरच्या घरी चविष्ठ असा मसाले भात कसा बनवायचा, याविषयी जाणून घेणार आहोत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये मसालेभाताची रेसिपी सांगितली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

साहित्य

कांदा
टोमॅटो
फ्लॉवर
वाटाणे
बटाटे
हिरवी मिरची
खडे मसाले
खोबऱ्याचा किस
तेल
जिरे
मोहरी
कढीपत्ता
चक्रीफूल
वांगी
गाजर
तांदुळ
हळद
मीठ
लाल तिखट
हिंग काळे तिखट
कोथिंबीर
लिंबू

कृती

सुरुवातीला कांदा उभा बारीक चिरून घ्यावा.
त्यानंतर टोमॅटोसुद्धा उभे बारीक चिरून घ्यावे.
सर्व खडे मसाले तव्यावर भाजून घ्यावे.
त्यानंतर खोबऱ्याचा किस लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा.
सर्व भाजलेले खडे मसाले आणि खोबऱ्याचा किस मिक्सरमध्ये बारीक करावा.
त्यानंतर एक कुकर घ्या.
गॅसवर कुकर ठेवू त्यात तेल टाका
तेल गरम झाले की त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, चक्रीफूल आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकावी.
त्यानंतर उभे चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकावा.
नीट परतून घ्या.
त्यानंतर त्यात आलं लसणाची पेस्ट टाका आणि नीट परतून घ्या.
बारीक चिरलेली कोथिंबीर टाका
त्यानंतर तुम्हाला आवडतात त्या भाज्या टाका, जसे उदा. बारीक चिरलेला फ्लॉवर, वाटाणे, गाजर, वांगी, बटाटे इत्यादी.
सर्व भाज्या नीट परतून घ्या.
त्यानंतर बारीक केलेला खडा मसाला टाका.
त्यानंतर त्यात हळद, मीठ, लाल तिखट, हिंग, काळे तिखट टाका.
स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुतलेला बासमती तांदुळ त्यात टाका. सर्व मिश्रण एकत्र करा.
त्यानंतर त्यात गरम पाणी टाका आणि वरून लिंबाचा रस पिळा. त्यानंतर कुकरचे झाकण लावा. दोन किंवा तीन शिट्ट्यांमध्ये तुमचा मसालेभात तयार होईल.
अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी मसालेभात बनवू शकता.

पाहा व्हायरल व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Amruta's_kitchen (@annapurna_amruta)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

annapurna_amruta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रात्रीच्या जेवणात बनवा चमचमीत मसाले भात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम” तर एका युजरने लिहिलेय, “जबरदस्त, एक नंबर” अनेक युजर्सना ही रेसिपी आवडली आहे.