बोंबील फ्राय, बोंबलाचं कालवण तसेच बोंबील भात तुम्ही आतापर्यंत खाल्लं असेल पण तुम्ही कधी मेथी बोंबील रेसिपी खाल्ली आहे का? नाही ना. चल तर आज जाणून घेऊयात मेथी बोंबीलची सोपी रेसिपी. बोंबील च्या सेवनामुळे डोळ्या संबंधीचे काही विकार असतील तर ते नष्ट होत असतात. केसांसाठी देखील बोंबील खूपच उपयुक्त मानले जातात. केस गळतीची समस्या असेल तर अशा समस्या साठी देखील बोंबील खूपच फायदेशीर ठरतात.

मेथी बोंबील साहित्य

  • १ जुडी मेथी
  • ८-१० सुके बोंबील
  • १ टीस्पून आलं लसूण पेस्ट
  • जीर
  • तेल
  • १ कांदा
  • १ टोमॅटो
  • मीठ
  • पाणी

मेथी बोंबील कृती

१. प्रथम बोंबील गरम पाण्यात ५ मिनिट भिजवून ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. मेथी स्वच्छ धुवून घ्या व बारीक चिरून घ्या.

२. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या. आलं लसूण कुटून घ्या.हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.

३. कढईमध्ये तेल टाकून जीर, आलं लसूण टाकून थोडं परतुन घ्या. नंतर त्यात कांदा टाका व थोडं परतुन घ्या.

४. कांदा परतल्यावर त्यात टोमॅटो टाका व सर्व मऊ झाल्यावर लाल तिखट, हळद टाकून बोंबील टाका व थोडं शिजू द्या.

हेही वाचा >> चमचमीत आणि चविष्ठ पापलेट सुक्का; अस्सल मालवणी बेत नक्की ट्राय करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. नंतर त्यात मीठ टाकून चिरलेली मेथी टाका. व पाण्याचा शिंपडा देऊन भाजी शिजू द्या.भाजी शिजल्यावर खायला घ्या.