काही पदार्थ आपण विसरत चाललो आहोत. पोहे, उपमा, मॅगी, थालीपीठाच्या जमान्यात सातूचे पीठ, उकडपेंडी असे घरगुती, चटपटीत आणि पौष्टिक नाष्ट्याचे पदार्थ आता नामशेष होत आहेत. त्यातल्या उकडपेंडीची रेसिपी आज आपल्यासाठी देत आहोत. घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या सामानातून तयार होणारा हा पदार्थ चवदार तर आहेच पण कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला आवडेल असाच आहे. शक्यतो गव्हाच्या पीठाचा केला जाणारा हा पदार्थ काहीवेळा ज्वारीच्या पीठापासूनही केला जातो. चला तर बघूया कशी करायची उकडपेंडी.
विदर्भ स्पेशल मिश्र पिठाची उकडपेंडी साहित्य
- १/४ कप ज्वारीचे पीठ
- १/४ कप गव्हाचे पीठ
- २ टेबलस्पून रवा
- १ कांदा बारीक चिरलेला
- ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- ६-७ कढीपत्त्याची पाने
- १ टीस्पून बेडगी मिरची पावडर
- १/२ टीस्पून हळद
- चिमुटभर हिंग
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
- गरम पाणी आवश्यकतेनुसार
- १ टीस्पून साखर
- कोथिंबीर बारीक चिरलेली
- १ टीस्पून लिंबाचा रस
विदर्भ स्पेशल मिश्र पिठाची उकडपेंडी कृती
स्टेप १
सर्वात आधी कढईमध्ये तेल तापवून मोहरी घालून तडतडू द्यावी, मग कांदा मिरची कढीपत्ता घालून कांदा मऊ होईपर्यंत शिजू द्यावा.
स्टेप २
आता ज्वारीचे पीठ गव्हाचे पीठ आणि रवा घालून सारखे हलवत रहावे आणि खमंग भाजून घ्यावे.
स्टेप ३
पीठ खमंग भाजून झाल्यावर त्यामध्ये हळद, हिंग,मीठ,साखर मिरची पावडर घालून एकजीव करुन घ्यावे.
स्टेप ४
आता त्यामध्ये थोडे थोडे गरम पाणी घालून एकजीव करत रहावे छान फुलल्यावर गॅस बंद करावे.
हेही वाचा >> नाद खुळा असा झणझणीत कोल्हापुरी मटणाचा ‘तांबडा रस्सा’ एकदा पिऊन बघाच; ही घ्या रेसिपी
स्टेप ५
शेवटी लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.