Moong Dal Bhaji Recipe : सध्या उन्हाळा आणि पावसाळा अशा मिश्र प्रकारचे वातावरण दिसत आहे. या वातावरणात गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशात भज्यांचे नाव जरी ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते. सहसा थोडा पाऊस पडल्यानंतर आपण अनेकदा कांदा भजी किंवा बटाटा भजी बनवतो. पण तुम्ही कधी मूग डाळीची भजी खाल्ली आहे का? हो, मूग डाळीची कुरकुरीत भजी. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही भजी कशी बनवायची? टेन्शन घेऊ नका. युट्युबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मूगडाळीची भजी कशी बनवायची, याविषयी माहिती सांगितली आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –
मूग डाळीची कुरकुरीत भजी रेसिपी
साहित्य
पिवळी मूग डाळ १ कप
बारीक चिरलेला कांदा १ मोठा
बारीक चिरलेला कोथिंबीर
आले १ इंच
हिरवी मिरची ३-४
हळद १/४ चमचा
मिरची पावडर
धने पूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
मीठ चवीनुसार
तळणीसाठी तेल
कृती
सुरुवातीला १ कप मूग डाळ स्वच्छ पाण्याने दोन -तीन वेळा धुवून घ्या. त्यानंतर २ ते ३ तासासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवा.
दोन तासानंतर ही डाळ चाळणीवर चाळून घ्या. डाळ चांगली निथळून घ्या. त्यामुळे डाळीतील जास्तीचे पाणी निघून जाईल.
डाळ मिक्सरमध्ये वाटून घेताना त्यात आलं आणि हिरवं मिरचे टाका आणि अजिबात पाणी न घालता जाडसर बारीक करा.
सर्व डाळ पाणी न घालता जाडसर बारीक करा.
त्यानंतर या बारीक केलेल्या डाळीच्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबिर, हळद, मिरची पावडर, गरम मसाला, धनेपूड आणि चवीपुरते मीठ घाला. सर्व मिश्रण एकत्र करा.
एक चमचा भिजवलेली मूग डाळ (बारीक करण्यापूर्वी बाजूला काढून घ्या) ती या मिश्रणामध्ये टाका यामुळे भज्यांना एक कुरकुरीतपणा लागतो.
हे मिश्रण भजी तेलामध्ये सोडण्यासाठी तयार झाले आहे.
गॅसवर एका पातेल्यात तेल गरम करा
दोन चमचे गरम तेल या भज्यांच्या मिश्रणामध्ये टाका आणि नीट एकत्रित करा.
गरम तेलात कमी आचेवर या मिश्रणाचे भजे लालसर तळून घ्या
कुरकुरीत भजी तयार होईल.
ही भजी तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा सॉस बरोब खाऊ शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
Sarita’s Kitchen या युट्युब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कुरकुरीत मूगडाळ भजी |मस्त पावसात गरमागरम चहा व भजी, ५ टिप्स वापरून कमी तेलकट मूग डाळ भजी रेसिपी”
अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला असून त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी रेसिपी छान असल्याचे लिहिलेय.