scorecardresearch

Premium

थंडीसाठी आता घरीच बनवा बहु्गुणी मोरावळा; या पद्धतीने केलेला मोरावळा वर्षभर टिकेल, ही घ्या सोपी रेसिपी

या पद्धतीने केलेला मोरावळा वर्षभर टिकेल, ही घ्या सोपी रेसिपी

How to make moravala/muramba?
मोरावळा किंवा मुरंबा रेसिपी (फोटो: Maharashtrian Recipes)

काचेच्या बरणीत भरलेला पिवळट, चॉकलेटी मुरंबा पाहिला की पटकन तोंडात टाकावासा वाटतो.. आवळा हा मुळातच पौष्टिक आणि पाचक असतो. त्यात जेव्हा आपण त्याचा मुरंबा किंवा माेरावळा बनवतो, तेव्हा त्याची पौष्टिकता खूप जास्त वाढते. एकदा मोरावळा बनवला की तो वर्षभर चांगला टिकतो. रोज एक चमचा मोरावळा म्हणजे घरच्या घरी तयार केलेले टॉनिक. चला तर पाहुयात याची सोपी रेसिपी

मोरावळा साहित्य

pimpri pcmc marathi news, pcmc property tax marathi news, pimpri chinchwad property tax marathi news, announcement of names on loud speaker
पिंपरी : प्रॉपर्टी टॅक्स थकविणाऱ्यांच्या नावाचा शहरभर होणार बोभाटा…महापालिकेने घेतला ‘हा’ निर्णय
Man puts 68 matchsticks in his nose GWR
बापरे! नाकात ६८ काड्या घालून केला Guinness World Record! व्हायरल होणारा फोटो पाहा…
10 murders in 12 days in Nagpur Question mark on law and order
नागपुरात १२ दिवसांत १० खून; कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : प्रकरण अभ्यास (भाग २)

१/२ किलो आवळे
१/२ किलो गूळ
चीमुठभर मीठ
चार-पाच लवंगा
१ ते २ दालचिनीचे तुकडे

मोरावळा कृती

स्टेप १

सर्वप्रथम आवळे धूवून ते मिठाच्या पाण्यात चार ते पाच तास भिजवून घ्या. त्यानंतर एका स्वच्छ टॉवेलवर टाकून स्वच्छ पुसून घ्यावेत. मग त्याला काटे चमचाच्या साह्याने सगळ्या साईडने बी पर्यंत टोचून घ्यावं.

स्टेप २

जाड बुडाच्या कढईमध्ये गूळ, एक छोटा चमचा पाणी, मीठ, लवंग दालचिनी घालून गुळ विरघळेपर्यंत गॅसवर ठेवून हलवत राहावे. मग त्यामध्ये आवळे घालून मंद गॅसवर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं आवळे शिजू द्यावं.

हेही वाचा >> थंडी स्पेशल ओली हरभऱ्याची भाजी; “या” खास पद्धतीने बनवा मुलंही आवडीने खातील

स्टेप ३

अवळ्यामुळे पाणी सुटल्यामुळे आपलं मिश्रण पातळ होतं. ते घट्ट होईपर्यंत मंद गॅसवर ठेवा त्यानंतर छान घट्ट झालं की गॅस बंद करा. मिश्रण थंड करून बंद काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवावे. हा बहुगुणी आवळा वर्षभर राहतो आणि अतिशय गुणकारीही आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mor awala recipe in marathi 1 kilo morawala recipe step by step srk

First published on: 22-11-2023 at 15:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×