Mung Chat Recipe In Marathi: ऑफिसमध्ये काम करताना, प्रवासादरम्यान किंवा वॉक घेताना आपण सहज काहीतरी खात असतो, चघळत असतो. काहींना काम करता-करता टाइमपास म्हणून ठराविक पदार्थ खाण्याची आवड असते. असे लोक तोंड सुरु राहावे यासाठी खोबरं, शेंगदाणे वगैरे गोष्टी खात असतात. पण हे पदार्थ खाऊन कधीकधी कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी तुम्ही मूग चाट (Mung Chat) हा पर्याय म्हणू शकता. मोड आलेल्या मुगापासून चाट बनवून खाता येते. शरीरासाठी फायदेशीर असणारा हा पदार्थ तुम्ही कधीही खाऊ शकता. सकाळी किंवा संध्याकाळी पौष्टिक नाश्ता म्हणूनही मुगाची चाट खाल्ली जाते. हेल्थची काळजी घेणाऱ्या फीटनेस फ्रीक लोक देखील ही चाट चवीने खातात.

साहित्य –

  • मोड आलेले मूग २ मोठे चमचे
  • कांदा १ मध्यम
  • सिमला मिरची १ मोठा चमचा (बारीक चिरलेली)
  • दाण्याचा कूट १ चमचा
  • सैंधव मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर १ चमचा (चिरलेली)
  • चवीसाठी आमचूर पावडर/लिंबू रस,
  • लाल तिखट
  • मीठ
  • खजूर- चिंचेची गोड चटणी

कृती –

  • मोड आलेले मूग हे पूर्णपणे वाफवून/शिजवून घ्या.
  • एका भांड्यात मूग (पाणी निथळून) त्यात बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, कोथिंबीर, दाण्याचा कूट घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
  • चवीसाठी त्या सैंधव मीठ, आमचूर पावडर/लिंबू रस, तिखट, मीठ, खजूर- चिंचेची चटणी घालून मिश्रण एकत्रित करा.
  • कोथिंबीर सजावटीसाठी वरती पेरून घ्या.

आणखी वाचा – घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाइल चविष्ट ‘Chicken 65’! आजच करा खास नॉन-व्हेज बेत

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

(ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेतलेली आहे.)