खरं तर पावटा अनेकांना आवडत नाही. त्यामुळे काही गृहिणीदेखील ही भाजी करण्यास टाळाटाळ करतात. परंतु, पावटा खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात पोटदुखीपासून ते कानदुखीपर्यंत अनेक आजारांवर पावटा गुणकारी असल्याचं पाहायला मिळतं. आम्लपित्ताच्या त्रासामुळे पोटात जळजळ होत असेल तर पावट्याच्या शेंगाचा काढा पिल्याने आराम मिळतो. अनेकदा स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी त्रास होतो अशावेळी पावटा किंवा पावट्याच्या शेंगाचा काढा बहुउपयोगी ठरतो. भूक कमी लागणे, अपचन होणे यासारख्या विकार असलेल्या लोकांनी तर आवश्यक पावटा खावा. याच पावट्याची खास भंडारा स्टाईल रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

भंडारी स्टाईल पावटयाच्या शेंगाची भाजी साहित्य

१ कप पावटयाच्या शेंगा सोलून घेतलेल्या
२ वांगी
३ बटाटे
१ मोठा कांदा
२ टोमॅटो
लाल तिखट
हळद
कसुरी मेथी
जीरे
कोथिंबीर
कढीपत्ता
गुळ
चवीनुसार मीठ

भंडारी स्टाईल पावटयाच्या शेंगाची भाजी कृती

१. सर्वात प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सोललेल्या शेंगा दाणे, कापून घेतलेली वांगी, बटाटे चांगले धुवून घ्या. नंतर गॅस चालू करून त्यावर एका कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता,जीरे, हिंगाची फोडणी दया.

२. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, तेलात फिरवून तो लालसर होईपर्यंत परतवून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, घालून परतवा तो नरम झाला की त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून ते एकदा चमच्याने फिरवून त्यात धुवून घेतलेल्या भाज्या घाला.

३. या भाज्या तेलात चांगल्या परतवून घ्या. वरून भाज्या शिजण्यापुरते गरम पाणी घालून वरून झाकण ठेवून १०-१५ मिनिटे भाज्या शिजू दया.

४. नंतर झाकण काढून त्यात चवीनुसार मीठ घालून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गुळाचा छोटा तुकडा घालून भाजी मिक्स करून घ्या. वरून कसुरी मेथी भुरभुरा.

हेही वाचा >> नाश्त्यासाठी झटपट बनवा खानदेशी पद्धतीचा मक्याचा पौष्टिक उपमा; मऊ लुसलुशीत तेवढाच मोकळा उपमा नक्की ट्राय करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. तयार भंडारी स्टाईल पावटयाच्या शेंगाची भाजी तयार आहे.