शुभा प्रभू-साटम

साहित्य

उरलेली पोळी, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, उकडलेले मक्याचे दाणे, बटाटा, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, लिंबू रस, मीठ, पुदिना चटणी किंवा केचप, चीझ, फोडणीला तेल

कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कांदा, टोमॅटो आणि भाज्या चिरून घ्याव्यात. लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्याव्यात. हिरव्या मिरच्या, आले ठेचून घ्यावे. बटाटे आणि मक्याचे दाणे उकडून, कुस्करून घ्यावेत. कांदा, टोमॅटो तेलात परतून त्यात सर्व साहित्य घालून एकत्र करावे. थोडेसे गार करावे. आता एका पोळीवर हे मिश्रण पसरावे. त्यावर दुसरी पोळी पसरावी. अध्येमध्ये चीझ पसरावे. आता थरांचा हा केक मंद आचेवर तव्यावर ठेवून चीझ वितळेपर्यंत सावकाश शेकून घ्यावा. त्रिकोणी कापून फस्त करावा.

या भाज्यांसोबतच तुम्ही पालक, कांदे पात, फरसबी, कोबी, राजमा(उकडलेले आणि कुस्करलेले दाणे) आदीसुद्धा वापरू शकता. तसेच आवडत असेल तर चिकनही वापरता येईल. शिवाय पोळीऐवजी उरलेली भाकरी  वापरूनही हा मसालेदार केक करता येईल.