नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात होणार असून त्याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात होणार आहे.पोटाला आराम देण्यासाठी आणि शरीराला पोषण देण्यासाठी नवरात्रीचे उपवास केले जातात. प्रामुख्याने साबुदाण्याचे तांदूळ, वरीचे तांदूळ, शेंगदाणे, राजगिरा, शिंगाड्याचे पीठ, सैंधव मीठ यांसारख्या पदार्थांचे सेवन केले जाते. तुम्हीही उपवास करणार असाल तर तुमच्यासाठी काही खास उपवासाच्या पदार्थांच्या पाककृती आम्ही सांगणार आहोत. चला तर आज पाहुयात फक्त २ बटाट्यापासुन उपवासाचा परफेक्ट शिरा कसा बनवायचा.

बटाट्याचा शिरा साहित्य :

  • बटाटा – ४ (मध्यम आकाराचे)
  • साखर- १/४ कप
  • तूप – दोन चमचे
  • फ्रेश क्रीम दोन चमचे
  • वेलची पावडर- अर्धा चमचा

बटाट्याचा शिरा कृती :

  • सर्वात आधी बटाटे उकडून घ्या आणि व्यवस्थित मॅश करुन घ्या.
  • एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि मॅश केलेले बटाटे तुपात परतून घ्या.
  • आता मध्यम आचेवर बटाटे शिजवून घ्या.
  • बटाटे शिजल्यानंतर त्यामध्ये साखर आणि क्रीम मिक्स करा. साखर पूर्णतः विरघळेपर्यंत सर्व सामग्री ढवळत राहा.

हेही वाचा >> नवरात्रीच्या उपवासाला बनवा झटपट आणि पौष्टिक ‘भगर पुलाव’, पटकन नोट करा रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • शिरा तयार झाल्यानंतर वरून वेलची पावडर सोडावी. गरमागरम शिऱ्याचा आस्वाद घ्यावा.
  • अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही नवरात्री उपवासादरम्यान नक्की ट्राय कर

उपवासाचा बटाट्याचा शिरा हा लोकप्रिय भारतीय गोड पदार्थ आहे.