Prawns Rice Recipe In Marathi: आपल्याकडे कोळंबी हा मासा विविध प्रकारे खाल्ली जातो. काहीजण कोळंबीचे कालवण/ रस्सा बनवतात. तर काही लोकांना कोळंबी फ्राय आवडते. पण कोळंबी भात हा पदार्थ आपल्याकडे सर्वात जास्त लोकप्रिय आहे. मासे खाणाऱ्या लोकांसमोर कोळंबी भात असे नुसते म्हटले तरी त्यांच्या तोंडाला पाणी सुटते. अशा या चविष्ट पदार्थाची सोपी रेसिपी आम्ही लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेऊन आलो आहोत.

साहित्य :

  • २ वाट्या तांदूळ
  • ४ मोठे कांदे
  • ३ लहान टोमॅटो
  • १ वाटी कोळंबी (साफ केलेली)
  • १ मोठा चमचा आलं-लसूण वाटण
  • २ मोठे चमचे बिर्याणी मसाला
  • ३ मोठे चमचे लाल तिखट (आगरी-कोळी मसाला)
  • ४ लाल मिरच्या
  • ५ लवंग
  • १ इंच दालचिनी
  • २ वेलची (वाटून घेतलेल्या)
  • १ चमचा जिरे
  • २ तेजपत्ता
  • अर्धा वाटी तेल
  • मीठ चवीनुसार

कृती :

  • तांदूळ चांगले धुऊन त्यात तेजपत्ता टाकून भात शिजवून सुटा करा.
  • कढईत तेल तापवून जिरं, आलं-लसूण, परता. त्यानंतर त्यामध्ये कांदे, टोमॅटो टाकून परता.
  • सर्व मसाले, वाटण त्यामध्ये टाका आणि पुढे कोळंबी टाकून एक वाफ आणा.
  • हे करत असताना चवीनुसार मीठ टाकायला विसरु नका.
  • नंतर त्या मिश्रणामध्ये भात, कोथिंबीर टाकून चांगले एकत्र करा व एक वाफ आणा.

आणखी वाचा – Mutton Chops: नॉन व्हेज खायचा मूड झालाय? घरच्या घरी बनवा चविष्ट मटण चॉप्स, नोट करा रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोळंबी हा मासा भारतासह जगभरात खाल्ला जातो. त्याच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. याशिवाय काही विशिष्ट जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. तसेच कोळंबी माश्यामध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे हेल्थ कॉन्शियस मंडळीही याचा मनापासून आस्वाद घेत असतात. कोळंबीमध्ये हाय कोलेस्ट्रॉल असल्याने याचे सेवन आरोग्यदायी असते.