ऑफिस, शाळा, कॉलेजमधून घरी जाताना अनेकदा काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. पाणीपुरी, शेवपुरी, दही चाट, भेळ, रगडा पॅटिस आदी चाटचा कोणताही प्रकार समोर ठेवला तरी तो खाण्याची इच्छा प्रत्येकाला होते. तर आज एका युजरने एक अनोखी चाट रेसिपी सांगितली आहे; जी तुम्ही घरच्या घरी बनवून पाहू शकता आणि चाट खाण्याचा आनंद लुटू शकता. या रेसिपीचे नाव आहे ‘ग्लास चाट’.

ग्लास चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती :

साहित्य :

  • एक कप मैदा
  • एक कप गव्हाचे पीठ
  • तीन उकडलेले बटाटे
  • दही
  • रगडा (पांढरे वाटाणे, हळद, लसूण पाकळ्या व मीठ घालून उकळवा आणि रगडा तयार करा)
  • चिंचेची चटणी
  • हिरवी चटणी
  • बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि कांदा
  • तेल
  • चवीनुसार मीठ

व्हिडीओ नक्की बघा :

कृती :

  • सगळ्यात पहिला मैदा आणि गव्हाच्या पिठाची एक गोल पोळी लाटून घ्या. त्यानंतर तिला सुरीने मधोमध कापून घ्या.
  • पोळीचा अर्धा भाग स्टीलच्या ग्लासवर गुंडाळून घ्या. त्यामुळे तळून झाल्यावर त्याला ग्लासचा आकार येईल. (टीप- ग्लास वापरण्यापूर्वी ग्लास तेलाने ग्रीस करा; अन्यथा तळल्यानंतर तो बाहेर काढता येणार नाही. तसेच पिठाच्या कडेला थोडे पाणी लावून घ्या; नाही तर तळताना त्या तुटतील.)
  • त्यानंतर काटा-चमच्याच्या साह्याने पिठावर छिद्रे करून घ्या आणि कढईत गरम तेलात सोडा.
  • तेलात सोडल्यानंतर ग्लास बाहेर काढा आणि तुम्हाला मैदा व गव्हाच्या पिठाचा एक ग्लास तयार झालेला तुम्हाला दिसेल.
  • तर या ग्लास चाटच्या आतमध्ये उकडलेला बटाटा, रगडा, दही, चिंचेची व हिरवी चटणी आणि वरून चिरलेला बारीक कांदा घालून घ्या.
  • अशा प्रकारे तुमचा ‘ग्लास चाट’ तयार. सोशल मीडियावर या रेसिपीचा व्हिडीओ @chefmodeon यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरचे नाव मेघना कडू असे आहे.