पच्छिम महाराष्ट्रातील सांगली या शहरातली सुप्रसिद्ध सांगली स्पेशल हटके भडंग रेसिपी आज आपण पाहणार आहोत. भडंग ही सांगलीची ओळख आहे. सांगलीबाहेर जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर भडंगाचे स्टॉल लागतात आणि त्यांना मागणीही प्रचंड आहे. इथली चिरमुरे बनवण्याची पद्धत जगावेगळी आहे आणि तीच भडंगाची खासीयत आहे.

सांगलीचे चमचमित भडंग साहित्य

  • १ कप मुरमुरे
  • १ टेबलस्पून लाल तिखट
  • १/२ टेबलस्पून पिठीसाखर
  • चवीनुसार मीठ
  • १/४ कप शेंगादाणे
  • ५-६ कडीपत्त्याचे पान
  • ४ टेबलस्पून तेल
  • वरून घेण्यासाठी चिरलेला कांदा व कोथिंबीर
  • १/२ टीस्पून मोहरी व जीरे फोडणीसाठी

सांगलीचे चमचमित भडंग कृती

स्टेप १
कढई तापायला ठेवावी व मुरमुरे थोडे भाजून घ्यावेत.

स्टेप २
आता कढईत तेल घालून फोडणी करावी. फोडणीत शेंगादाणे घालून लाल होइपर्यंत परतून घ्यावे. कडीपत्ता घालावा, आता फोडणीत मीठ,लाल तिखट व पिठीसाखर घालून हलवून लगेच मुरमुरे घालावे. फोडणी व मसाला मुरमुर्यांना व्यवस्थित लागेल असे मुरमुरे हलवून घ्यावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टेप ३
आपल खमंग चविष्ट भडंग तयार आहे. बारिक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालून भडंग सर्व्ह करावे.