Semolina Fries : लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही फ्रेंच फ्राईज खायला आवडतात. पण बहुतेकांना बाजारातून फ्रेंच फ्राईजच आणावे लागतात. कारण घरच्या घरी बटाटा फ्रेंच फ्राई तयार करणे सर्वांसाठी सोपे नसते. अशा परिस्थितीत, तुम्ही रव्याचे फ्रेंच फ्राईजची ही अतिशय सोपी आणि अतिशय चवदार रेसिपी तयार करून पह. कुरकुरीत आणि चविष्ट रव्याचे फ्राईज तुमच्या नाश्त्याची चव वाढवू शकते. यासाठी तुम्हाला जास्त साहित्याची गरज नाही किंवा जास्त वेळ लागणार नाही.

रव्याचे फ्राईज बनवणे अतिशय सोपे आहे. त्याची चव देखील उत्कृष्ट आहे. एवढेच नाही तर ते बनवायला जास्त वेळ लागत नाही. ही रेसिपी सर्वांना आवडेल. तसेच रव्यापासून तयार केलेले असल्याने ते फारसे जड होणार नाही. चला तर मग आज जाणून घेऊया रव्याचे फ्राईज करण्याची उत्तम रेसिपी, जी इंस्टाग्राम यूजरने (@iamtarneet) त्याच्या अकाउंटवर व्हिडिओद्वारे शेअर केली आहे.

हेही वाचा – Raw Mango Rasam Recipe: घरीच बनवा कैरीचे रस्सम, भात-पापडसोबत मारा ताव!

रव्याचे फ्राईजसाठी रेसिपी

रव्याचे फ्राईज तयार करण्यासाठी साहित्य
रव्याचे फ्राईजसाठी १ कप पाणी, १ कप रवा, १ चमचा ओवा,१ टीस्पून चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, १ टेबलस्पून तेल आणि १ कप तेल तळण्यासाठी घ्या. चला आता जाणून घेऊया रवा फ्राईज बनवण्याची सोपी पद्धत.

हेही वाचा : आंबड-तिखट-गोड गोळवणी करा, भातासोबत त्यावर ताव मारा! ही घ्या विस्मृतीत चाललेल्या पदार्थाची रेसिपी

रव्याचे फ्राईज करण्यासाठीची कृती
रवा फ्राई करण्यासाठी, प्रथम एका पॅनमध्ये पाणी घ्या आणि त्यात रवा, मीठ, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाका आणि काही मिनिटे शिजवा. हे मिश्रण घट्ट होईल . नंतर या मिश्रणात १ चमचा तेल टाकून चांगले मिसळा. नंतर हे पीठ एका भांड्यात काढून ठेवावे. आता ते सपाट करून मोठा गोळा बनवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नंतर हे पीठ बटर पेपरवर ठेवा आणि दुसऱ्या बटर पेपरने झाकून जाड रोटी लाटून घ्या. आता रव्याचे तुकडे करून फ्रेंच फ्राईजप्रमाणे तळून घ्या. तुमचे स्वादिष्ट रव्याचे फ्राईज तयार आहेत. गरमागरम सॉसबरोबर सर्व्ह करा.