Shravan Somvar Recipes: श्रावणातल्या शिवरात्रीच्या उपवासातही विविध पदार्थ खाल्ले जाऊ शकतात, अनेक लोकांना ते खायला आवडते. आज आम्ही ज्या रेसिपी बद्दल सांगणार आहोत, त्याची चव केवळ अप्रतिमच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. सोपी रेसिपी जाणून घेऊया. चला पाहुयात बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप कशी बनवायची.

बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप साहित्य –

१. बटाटे – २

२. रताळी – पाव किलो

३. मीठ – चवीनुसार

४. तिखट – १ चमचा

५. पिठीसाखर – १ चमचा

६. राजगिरा पीठ – १ वाटी

७. तेल – अर्धी वाटी

८. लिंबाचा रस – अवडीनुसार

बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप कृती –

१. बटाटा आणि रताळी स्वच्छ धुवून त्याची साले काढून घ्यायची.

२. दोन्हीचे गोलाकार एकसारखे काप करायचे, आवडीनुसार जाड-पातळ करु शकतो.

३. एका ताटलीत राजगिऱ्याचे पीठ घेऊन त्यामध्ये तिखट, मीठ, पिठीसाखर घालावी.

४. आवडीनुसार यामध्ये लिंबाचा रस पिळून हे मिश्रण एकजीव करावे.

५. बटाटा आणि रताळ्याचे काप यावर चांगले घोळवून घ्यावेत.

६. तव्यावर तेल घालून हे काप त्यावर ठेवावेत आणि दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यावेत.

हेही वाचा >> Shravan special: श्रावण स्पेशल व्हेज थाळी; पारंपारिक पद्धतीने बनवलेली ही रेसिपी नक्की ट्राय करा

७. बारीक गॅसवर वरती झाकण ठेवून हे काप चांगले शिजू द्यावेत म्हणजे कच्चे राहत नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८. दोन्ही बाजुने चांगले कुरकुरीत झाल्यावर हे काप डीशमध्ये काढून खायला घ्यावेत.