Spongy Bhaji : भजी हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. तुम्ही आजवर कांदा भजी, बटाटा भजी, कोबी भजी, इत्यादी भज्यांचे प्रकार खाल्ले असतील पण तुम्ही कधी स्पंजी भजी खाल्ली आहे का? तुम्हाला वाटेल, हा कोणता भजीचा प्रकार आहे. अनेक लोकांना स्पंजी विषयी माहिती नाही. हो स्पंजी भजी. या भजीमध्ये कांदा किंवा बटाटा असे काहीही समाविष्ट केले जात नाही. फक्त बेसनपासून बनवली जाणारी ही भजी मस्त टम्म फुगते. चवीला अप्रतिम आणि अतिशय मऊ असणारी ही भजी कुणालाही आवडेल.

तुम्ही जर ही भजी खाल्ली नसेल तर तुम्ही ही भजी बनवू शकता. ही भजी बनवायला फार वेळ लागत नाही. झटपट काही खायचे असेल आणि कुणाला खाऊ घालायचे असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. लहान मुले अनेकदा भज्यांमधून कांदा, बटाटा बाहेर काढतात. त्यांच्यासाठी तुम्ही कांद्याविना बनवली जाणारी ही भजी बनवू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही भजी बनवायची कशी तर ही रेसिपी लगेच नोट करा आणि गरमा गरम स्पंजी भजी बनवा.

best strategies to overcome laziness
तुम्हाला खूप जास्त आळस येतो का? ‘ही’ असू शकतात कारणे; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
Home Remedies for White Hair
तरुणपणातच तुमचे केस पांढरे होतायत का? नारळाच्या तेलात फक्त ‘या’ दोन गोष्टी मिसळा, नैसर्गिकरित्या होऊ शकतात काळे
A power packed Anjeer Milkshake shake that is full of nutrients good health and great for when you want instant energy on the go
Anjeer Milkshake: फक्त ‘या’ ड्रायफ्रूटचं प्या मिल्क शेक; भरपूर कॅल्शियमसह या गोष्टीही शरीराला मिळतील; पाहा सोपी रेसिपी अन् डॉक्टरांचा सल्ला
khujli gang sprinkled itching powder and theft
गुपचूप येतात, अंगावर खाज सुटणारी पावडर टाकतात अन् लक्ष विचलित होताच…. खुजली गँगचा Video Viral
Shocking accident video
भरधाव वेगानं जाणाऱ्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात; नेमकं कुठे चुकलं तुम्हीच सांगा; थरारक VIDEO होतोय व्हायरल
Sabudana Paratha recipe
Sabudana Paratha : आषाढी एकादशीला बनवा झटपट करता येईल असे उपवासाचे पराठे, पाहा ही सोपी रेसिपी; VIDEO Viral
How To Whiten Teeth, Home Remedies
Teeth Whitening: दातांवरील पिवळे डाग गायब करू शकतात ही ४ फळे; डेंटिस्टने सांगितलेले हे उपाय वाचा व खळखळून हसा
Gut, Stomach Infection Home Remedies
अल्सरचा त्रास, पोटही बिघडतंय? जिरं, ओवा व ‘या’ मसाल्याचा वापर देईल चुटकीसरशी आराम; खाण्याची योग्य पद्धत वाचा

साहित्य

  • बेसन
  • लाल तिखट
  • हळद
  • जिरे पावडर
  • धनेपूड
  • मीठ
  • बेकिंग सोडा
  • गरम मसाला
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

हेही वाचा : Soya Sticks आवडतात? मग घरच्या घरी असे बनवा कुरकुरीत सोया स्टिक

कृती

  • सुरुवातीला एका भांड्यात बेसन घ्या.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, जिरे पावडर आणि धनेपूड घाला.
  • गरम मसाला टाका.
  • चवीनुसार मीठ घाला.
  • पीठ चांगले पाण्याने भिजवून घ्या.
  • पिठाच्या गाठी होऊ नये, असे पीठ भिजवावे.
  • पीठ भिजवल्यानंतर दहा मिनिटे झाकून ठेवा.
  • दहा मिनिटानंतर या पिठात बेकिंड सोडा मिक्स करा.
  • शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • सर्व मिश्रण एकत्र करा.
  • गॅसवर एक कढई ठेवा.
  • त्यात तेल गरम करा.
  • तेल गरम झाल्यानंतर त्यात एका छोट्या चमच्याचा मदतीने छोटी छोटी भजी तेलात सोडा.
  • भजी कमी आचेवर तळून घ्या.
  • चवीला अप्रतिम वाटणारी ही गरमा गरम भजी तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.