रविवार म्हंटल की, प्रत्येकाला मांसाहारी खाण्याची इच्छा होते. अंड, मासे, चिकन,मटण यापैकी एखादा पदार्थ दुपारच्या जेवणात तर हमखास ठरलेला असतो. पण, काही जण चिकन किंवा चायनीज फ्राइड राईस खाणं ही तितकंच पसंत करतात. बाहेर जाऊन तो खाण्याकरता घरच्या मोठ्यांकडे आग्रह धरतात. पण, हाच फ्राइड राईस जर घरी केला तर? तुम्ही आतापर्यंत अनेक फ्राइड राईस खाल्ले असतील. पण,आज आपण कोळंबी फ्राईड राईस कसा बनवायचा हे पाहणार आहोत. चला तर पाहू या पदार्थाची सोपी रेसिपी.

साहित्य –

World Idli Day 2024
World Idli Day 2024 : मऊ, लुसलुशीत अन् टम्म फुगलेली इडली कशी बनवायची? ‘या’ ट्रिक्स लक्षात ठेवा
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
How to make raw mango dal mango dal
तुम्ही कधी चटकदार कैरीची डाळ खाल्ली आहे का? नसेल तर ही घ्या सोपी रेसिपी
  • चार चमचे तेल
  • एक कप प्रॉन्स
  • किसलेले आलं (एक चमचा)
  • किसलेली लसूण
  • एक हिरवी मिरची
  • १/२ कप शिमला मिरची (चिरलेली)
  • १/२ कप चवळीच्या शेंगा
  • १/२ कप गाजर
  • १/२ कप कांद्याची पात, कांदा
  • एक चमचा ग्रीन चिली सॉस
  • एक चमचा सोया सॉस
  • एक चमचा व्हाईट व्हिनेगर
  • एक चमचा मीठ
  • १ १/२ कप तांदूळ

हेही वाचा…उन्हाळ्यात लहान मुलांसाठी बनवा थंडगार ‘चिकू मिल्कशेक’; पाहा सोपी रेसिपी

कृती –

  • कढईत तेल गरम करून त्यात कोळंबी घाला व मोठ्या आचेवर शिजवा.
  • त्यानंतर बारीक चिरून घेतलेली लसूण, हिरवी मिरची, सिमला मिरची, चवळीच्या शेंगा, कांदा, गाजर घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, व्हाईट व्हिनेगर घालून पुन्हा मिक्स करा.
  • त्यानंतर मिश्रणात, शिजवून घेतलेला तांदूळ आणि मीठ घाला.
  • मग बारीक चिरून घेतलेला कोबी आणि कांद्याची पात त्यात घाला.
  • हे सर्व व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ तसंच ठेवा.
  • नंतर एका प्लेटमध्ये सर्व्ह करा.
  • अशाप्रकारे तुमचा ‘कोळंबी फ्राईड राईस’ तयार.