सरबत प्यायचं म्हंटल की, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. तसेच उन्हाळ्यात देखील नेहमीच काही तरी थंडगार पिण्याची इच्छा होते. पण, नेहमीच बाहेरून सरबत किंवा ज्यूस विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी हेल्दी आणि स्वादिष्ठ ज्यूस बनवता आला तर… म्हणून आज आपण ‘चॉकलेट चिकू मिल्क शेक’ कसं बनवायचं हे पाहणार आहोत. चला तर पाहुयात अगदी कमी वेळेत होणाऱ्या या मिल्क शेकची सोपी रेसिपी…

साहित्य –

remedies beauty tips for dry lips
उन्हाळ्यात ओठ कोरडे पडलेत? या ‘४’ टिप्सने उन्हाळ्यात ओठ ठेवा कूल आणि मुलायम!
mango face mask for summer
उन्हाळ्यात फळांचा राजा घेईल तुमच्या थकलेल्या चेहऱ्याची काळजी! पाहा घरगुती मँगो फेस मास्क DIY
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
market is loaded with cakes candies chocolates for Easter festival
ईस्टर सणासाठी बाजारात केक, कॅन्डी, चॉकलेटची रेलचेल
  • चिकू ८ ते ९
  • एक चमचा साखर
  • ५०० मिलीलिटर दूध
  • न्यूट्रेला
  • गार्निशसाठी बदाम

हेही वाचा…‘गाजराचा उपमा’ कधी खाल्ला आहे का? पाहा ‘या’ पदार्थाची सोपी रेसिपी

कृती –

  • आठ ते दहा चिकू धुवून घ्या व त्याचे साल काढून घ्या.
  • त्यानंतर चिकूच्या बिया काढून टाका.
  • त्यानंतर चिकूचे लहान लहान तुकडे करून घ्या.
  • मिक्सरचे भांड घ्या आणि त्यात चिकूचे लहान तुकडे, साखर, दूध, न्यूट्रेला घालून सर्व पदार्थ मिक्सरला बारीक करून घ्या.
  • त्यानंतर ग्लासमध्ये हा ज्युस काढून घ्या. त्यावर वरून बारीक करून घेतलेलं बदामाचे तुकडे आणि न्यूट्रेला घाला.
  • अशाप्रकारे तुमचे चॉकलेट ‘चिकू मिल्क शेक’ तयार.