Fish Fry with french bee and chips: मासे म्हटलं की, अनेक नॉन व्हेज प्रेमींच्या जीभेला पाणी सुटते. हॉटेलमध्ये किंवा घरी आपण अनेकदा फिशच्या अनेक रेसिपी ट्राय करतो. मासे हे केवळ चवीपुरता नाही आरोग्यासाठीही पौष्टिकही असतात. फिश फ्राय म्हटलं की, सर्वाच्या आवडीचा प्रकार. फिश फ्राय खूप वेगवेगळ्या प्रकारचा मिळतो. कुरकुरीत पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, चिलापी फ्राय, कोळंबी फ्राय रेसिपी, हॉटेल मध्ये मिळतो तसा कुरकुरीत फिश फ्राय, बरेच प्रकार आहेत. जर तुम्हाला हॉटेलसारखी एकदम चमचमीत अशी फिश रेसिपी खायची असेल तर ही आगळी वेगळी आणि झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा. चला तर मग पाहुयात फिश फ्राय बटर रोस्ट फ्रेंच बीन आणि चिप्स रेसिपी कशी बनवायची..

फिश फ्राय, बटर रोस्ट फ्रेंच बीन आणि चिप्स

साहित्य

१. ५०० ग्राम फिश फिलेट
२. १ चमचा पिंक सॉल्ट
३. १ चमचा मस्टर्ड पावडर
४. १/२ चमचा काळे मिरे पूड
५. १/२ लिंबाचा रस
६. २ चमचे तेल
. १/२ चमचा मिक्सड हरब्स
८. २ चमचे बटर
९. १०० ग्राम फ्रेंच बीन

फिश फ्राय, बटर रोस्ट फ्रेंच बीन आणि चिप्स

कृती

१. सर्वप्रथम फिश धुवून तिला मॅरीनेट करायला ठेवावे। त्यात मीठ, मिरे पूड, मस्टर्ड पावडर, लिंबाचा रस आणि तेल घालावे आणि शेवटी हरब्स घालावे

२. आता ३० मिनिटे झाल्यावर पॅन मधे बटर टाकून फिश फ्राय करून घ्यावी. जवळपास १५ मिनिटे लागतील.

हेही वाचा >> कोळी पद्धतीची जबरदस्त स्वादिष्ट अशी “मेथी बोंबील” रेसिपी; एकदा खाल तर खातच रहाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३. आता १५ मिनिटे होत असताना त्यात बाजूला फ्रेंच बीन त्याच बटर मध्ये रोस्त कराव्यात। आता बीन हलक्या रोस्त झाल्यावर सगळे एकत्र सर्व्ह करावे