शुभा प्रभू साटम

साहित्य :

*  कोवळी रताळी

*  कणिक

*  दूध

*  पाणी

*  गूळ

*  तूप.

कृती

कृती – कोवळी रताळी सोलून किसून घ्यावीत. त्यामध्ये कणिक, दूध आणि पाणी घालून पातळसर मिश्रण करावे. या मिश्रणात किसलेला गूळ घालावा. रताळी गोड असल्याने तशी तर त्याची फारशी गरज नाही, तरीही गोड जास्त आवडत असल्यास गूळ घालावा. पाच-दहा मिनिटे हे मिश्रण मुरू द्यावे. यानंतर तव्यावर तूप घालून त्याची छोटी छोटी धिरडी काढून घ्यावी. या पॅनकेक्सचा आकार अगदी सुबक येत नाही, पण खायला मात्र छान लागतात.

कणिक वापरायची नसेल तर मैदा, ज्वारी, बाजरी, नाचणी यापैकी कोणतेही पीठ तुम्ही वापरू शकता. गुळाऐवजी साखरही वापरता येईल.