Sweets Recipes : अनेकदा आपल्याला एखादा गोड पदार्थ बनवावा, असे वाटते पण नेमके काय बनवावे, हे सुचत नाही. कमी वेळेत झटपट होणारा कोणता गोड पदार्थ बनवावा, असा सुद्धा प्रश्न पडतो पण आज आम्ही तुम्हाला एक हटके पदार्थ सांगणार आहोत. एक रव्यापासून तुम्ही हा गोड पदार्थ झटपट बनवू शकता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक कप रव्यापासून असा कोणता पदार्थ तयार केला जातो? तुम्हाला माहितीये का एक कप रव्यापासून स्वादिष्ट गुलाबजामून बनवू शकता. रव्याचे गुलाबजामून चवीला अप्रतिम वाटतात आणि बनवायला सुद्धा तितकेच सोपी आहे. हा पदार्थ कसा बनवावा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका. आज आपण एक कप रव्यापासून रव्याचे चवीला अप्रतिम असे गुलाबजामून कसे बनवायचे, हे जाणून घेऊ या.

साहित्य

  • तूप
  • दूध
  • रवा
  • साखर
  • पाणी
  • तेल

हेही वाचा : साबुदाण्याची कुरकुरीत भजी खाल्ली का? झटपट होणारी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • सुरूवातीला एक कढई गॅसवर ठेवा आणि या कढईत तूप गरम करा.
  • तूप वितळले की त्यात दोन कप दूध टाका.
  • दूधाला उकळी आली की त्यात एक कप रवा त्यात टाका.
  • गॅस कमी आचेवर ठेवा.
  • दूधामध्ये हा रवा चांगला एकजीव करा.
  • रवा चांगला परतून घ्या.
  • त्यानंतर घट्ट रवा तयार होईल.
  • त्यानंतर एका भांड्यामध्ये हा घट्ट झालेला रवा काढून ठेवा आणि त्यानंतर रवा थोडा थंड होऊ द्या.
  • त्यानंतर गॅसवर एक भांडे ठेवा.
  • त्यात दोन कप साखर टाका आणि अर्धा कप पाणी टाका. ॉ
  • पाण्यात साखर वितळली की घट्ट पाक तयार होईल.
  • त्यानंतर गॅस बंद करा.
  • दूध टाकलेल्या घट्ट रव्याचे छोटे छोटे गोळे तयार करा आणि सर्व गोळे गरम तेलातून मंद आचेवर तळून घ्या.
  • त्यानंतर हे तळलेले गोळे साखरेच्या पाकात टाका. थोडा वेळ पाकात राहिल्यानंतर हे गुलाबजामून बाहेर काढा.
  • स्वादिष्ट असे हे रव्याचे गुलाबजामून तयार होईल.
  • तुम्ही हे गुलाबजामून झटपट केव्हाही बनवू शकता.