सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्षभर लागणारे उन्हाळी पदार्थ करण्यात व्यस्त आहेत. यामध्ये शेवया, पापड, कुरड्या, सांडगे, वेफर्स, उपवासाचे साबुदाणा पापड आदी पदार्थ बनविण्यासाठी लगबग सुरू आहे.उन्हाळी वाळवण म्हणजे आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची खास ओळख. उन्हाळी वाळवण ही वर्षभर टिकणारी गोष्ट असल्यामुळे ग्रामीण भागात सणासुदीला तळणाचा बेत ताटात असतोच. ग्रामीण भागातील महिलांनी आजही ही परंपरा जपली आहे. एकमेकींच्या मदतीने अंगणात उन्हाच्या आधी ही कामे उरकण्याची लगबग दिसून येत आहे. मात्र शहरातल्या महिलांना याबद्दल फारशी माहिती नसते. मात्र आता काळजी करु नका, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, खास तांदळाच्या सांडग्यांची रेसिपी.
तांदळाचे सांडगे साहित्य
१ कप तांदूळाचे पीठ
१/२ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून हळद
१ हिरवी मिरची बारीक चिरून
४ कप पाणी
१/२ टीस्पून मीठ
चिमूटभर पापडखार
तांदळाचे सांडगे कृती
१. एका कढईत दोन कप पाणी तापत ठेवावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात मीठ व पापड खार टाकून हलवून घेणे.
२. तांदळाच्या पिठात दोन कप पाणी घालून पातळसर मिश्रण तयार करावे.हे मिश्रण कढईतल्या पाण्यात हळूहळू ओतावे.
३. तांदळाच्या पिठाचे मिश्रण सतत ढवळत राहावे.आता त्या मध्ये जीरे, मिरची,हळद टाकून चांगले एकजीव करुन घ्यावेत.
४. आपण पिठल करतो ना तसंच घट्ट सर कराव. नंतर गॅस बंद करावा.
५. गरम असतानाच सांडगे घालावेत.एका प्लास्टिकवर सांडगे घालावेत.हात पाण्यात बुडवून थोडंसं मिश्रण हातात घेऊन अंगठ्याने सरकवावे.
६.नाही तर हल्ली केकची पाईपीग बॅगमध्ये बॅटर भरून स्टार नोझेलने छान घालता येतात.
७.दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यावे. दोन्ही बाजूंनी वाळवावेत.पंख्या खाली सुद्धा वाळतात.तरी सुद्धा एक दिवस उन्हात ठेवावे. वर्ष भर छान टिकतात.
हेही वाचा >> रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी कच्च्या पपईची भाजी; गृहिणींनो एकदा नक्की ट्राय करा
८.दोन दिवस वाळल्यावर असे दिसतात.आपले सांडगे तळण्यासाठी तयार आहे.
९.आपले सांडगे तळण्यासाठी तयार आहेत.