Tiffin Special Recipe: आजकालच्या लहान मुलांना चटपटीत पदार्थ खाण्यास प्रचंड आवडतात. घरातली भाजी चपाती, डाळ भात ताटात वाढले की लगेच नाक मुरडतात. केवळ घरात नव्हे तर डब्यात देखील त्यांना चटपटीत काही तरी हवे असते. नाहीतर ते डबा उघडून देखील पाहत नाही. अशामुळे मुलं उपाशी राहतात, आणि त्यांचे पोषण देखील व्यवस्थित होत नाही. तुमच्या ही घरी हीच परिस्थिती आहे का? आणि रोज रोज डब्याला काय चटपटीत करून द्यायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक हटके रेसिपी घेऊ आलो आहोत. चला तर मग पाहुयात मिक्स व्हेजिटेबल चीझ पॅाकेट रेसिपी
व्हेजिटेबल चीझ पॅाकेट साहित्य
- उकडलेले बटाटे
- किसलेले गाजर
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेली शिमला मिरची
- मक्याचे दाणे
- आलं आणि हिरवी मिरची पेस्ट
- गरम मसाला
- मीठ
- साखर
- कोथिंबीर
- ब्रेड स्लाइस
- मैदा
- पाणी
- तेल
- लाल मिरची पावडर
- मोझरेला चीझ
- ब्रेडचा चुरा
व्हेजिटेबल चीझ पॅाकेट कृती
प्रथम एक बाउल घ्या. त्यात उकडलेला बटाट कुस्करुन घ्या. नंतर त्यात किसलेले गाजर, शिमला मिरची , बारीक चिरलेला कांदा, मक्याचे दाणे , लाल मिरची पावडर, आलं- मिरची पेस्ट , गरम मसाला, साखर, मीठ ,आणि कोथिंबीर टाकून अॅड करुन घ्या.
त्यानंतर बाउल मधील सर्व मिश्रणाला नीट एकजीव करुन घ्या. एकजीव केलेल्या मिश्रणाचे नीट पीठ तयार करुन घ्या. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये ब्रेडच्या स्लाइस घ्या. यानंतर ब्रेडच्या स्लाइसवर मोझरेला चीझ हाताच्या साहाय्याने पसरवा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण या ब्रेडच्या स्लाइसवर अॅड करुन लावा.
यानंतर एका ब्रेड स्लाइसचे आपल्या सोयीनुसार भाग करुन घ्या. यानंतर पुढच्या स्टेपमध्ये एका वाटीमध्ये थोडासा मैदा घ्या. त्या मैदामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ टाकून चांगले मिक्स करुन घ्या.
या मिश्रणाचे पातळ असे बॅटर तयार करा. नंतर त्यामध्ये तयार केलेले ब्रेडचे स्लाइस डिप करा. डिप केलेले स्लाइस ब्रेडच्या चुऱ्यामध्ये मिक्स करुन घ्या.
यानंतर गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. नंतर त्यात तेल टाकून तेल गरम होऊ द्या. यानंतर गॅसला लो फेमवर करुन आपले व्हेजिटेबल चीझ पॅाकेट तळून घ्या.
व्हेजिटेबल चीझ पॅाकेटचा रंग ब्राऊन झाल्यावर त्यांना बाहेर काढा. तुम्ही हे व्हेजिटेबल चीझ पॅाकेट सॅास सोबत सर्व्ह करु शकता.