ज्योती चौधरी-मलिक

साहित्य

अर्धा किलो टोमॅटो (मात्र हे सुकलेले, जुने नकोत. ते छान लाल आणि चवीला आंबटगोड असणारे गावरान टोमॅटो असतील तर उत्तम.) २ मोठे कांदे, २ चमचे तेल, १ वाटी बेसन, ३-४ हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, १ चमचा मोहरी, १ चमचा तिखट, चिमूटभर हिंग, चवीनुसार साखर, मीठ.

कृती –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईत तेल तापायला ठेवा. त्यात मोहरी, हिंग घालून कांदा परता. तो पारदर्शक झाल्यानंतर आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. आता यात हळद, तिखट, मीठ घाला. चवीनुसार मीठ, साखर घाला. यानंतर त्यात चिरलेले टोमॅटो घालून १०-१२ मिनिटे शिजवा. टोमॅटो छान मंद आचेवर शिजायला हवेत. शिजण्यासाठी अजिबात पाणी घालू नका. यानंतर या मिश्रणाला गरजेनुसार बेसन लावावे. आपल्याला हवे त्याप्रमाणे म्हणजे पातळसर किंवा जाडसर. बेसन लावणे म्हणजे हळूहळू त्या टोमॅटोच्या मिश्रणात मावेल एवढे बेसन पीठ पेरत जाणे. या वेळी सतत हे पिठले चमच्याने हलवत राहा, म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाहीत. यानंतर २-३ मिनिटे झाकून ठेवा आणि एक दमदमीत वाफ काढा. वरून कोथिंबिरीची पखरण करा. फुलके किंवा भाताबरोबर खा.