शुभा प्रभू-साटम

वातावरणात गारवा आलाय. सकाळच्या वेळी काही तरी गरमागरम प्यावेसे वाटू लागले आहे. त्यासाठीच न्याहरीला हे टोमॅटो सूप कम सार

साहित्य

लालबुंद टोमॅटो, अर्धा चमचा तूर / मूग डाळ, अर्धी वाटी ओले खोबरे, आले, ओवा, लाल तिखट, गूळ, चिंच किंवा लिंबू रस, मीठ, फोडणीचे साहित्य

कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोमॅटो, खोबरे, डाळ आणि थोडासा ओवा हे सर्व एकत्रित कुकरमधून मऊ उकडून घ्यावे. गार करून मिक्सरला वाटून घ्यावे. आता यात मीठ, गूळ, चिंच किंवा लिंबाचा रस, तिखट असे सारे साहित्य घालावे. वरून तूप, जिरे, हिंग, कढीपत्ता याची झणझणीत फोडणी द्यावी. आवडत असल्यास यात रसम मसालाही घालावा.