उपवास म्हटलं की घराघरात खिचडी हमखास बनवली जाते. खिचडीसोबत उपवासाची आमटी, रताळे बनवले जातात. तसेच बटाट्याचे वेफर्स, उपवासाचे थालीपीठ बनवले जातात. नेहमी उपवासाला हेच पदार्थ बनवले जातात. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत, उपवासाची बटाटा भाजी. उपवासाच्या प्रत्येक पदार्थात बटाटा हा असतोच. ही भाजी तुम्ही नैवेद्यालाही दाखवू शकता.
नैवेद्याची बटाटे भाजी साहित्य
- ६ बटाटे उकडलेले
- १ टेबलस्पून तेल
- टेबलस्पून कोथिंबीर धुवून बारीक कापलेली
- १ tsp हिरव तिखट
- चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर
- १० कढीपत्त्याची पाने
- १/४ चमचा हळद
- अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग
नैवेद्याची बटाटे भाजी कृती
स्टेप १
बटाट्याची सालं काढून त्याच्या फोडी कराव्यात कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरी जिरं कढीपत्ता यांची खमंग फोडणी करून त्यामध्ये हळद घालावी व बटाट्याच्या फोडी टाकून छान परतावे
स्टेप २
त्यामध्ये हिरवं तिखट चिरलेली कोथिंबीर साखर मीठ घालून छान परतावे व दोन मिनिटं मंद गॅसवर ठेवून मध्ये मध्ये परतत राहावे.
हेही वाचा >>फक्त ५ मिनिटात करा खानदेशी पद्धतीची शेंगदाण्याची झणझणीत, लज्जतदार चटणी; साध्या जेवणाची वाढेल गोडी
स्टेप ३
हिरव तिखट घातल्याने मिरची तोंडात येत नाही व भाजीची चव ही अप्रतिम लागते भाजी छान मंद गॅसवर फ्राय केल्याने ती खूप खमंग होते