उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे आम्ही तुम्हाला एक हटके पदार्थ सांगणार आहोत. जो चवीला स्वादिष्ट आहे. आज आपण उपावासासाठी उपवासाची भाकरी आणि बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत.

उपवासाची भाकरी आणि बटाट्याची रस्सा भाजी साहित्य

  • २ कप भाजणीचे पीठ
  • १/२ टेबलस्पून मीठ
  • २ मोठे उकडलेले बटाटे
  • १ टेबलस्पून तेल
  • १ टेबलस्पून लाल मिरची पावडर
  • २ टेबलस्पून शेंगदाण्याचे कुट
  • १ टेबलस्पून मीठ

उपवासाची भाकरी आणि बटाट्याची रस्सा भाजी कृती

१. सर्वप्रथम पराती मध्ये पीठ घेऊन त्यात मीठ टाकून आपण भाकरीला जसं पीठ भिजवतो तसं भिजून घ्या व ५ मिनिट झाकून ठेवा.

२. आपण ज्वारीची भाकरी जशी मध्यम जाड करतो तशीच करून घ्या.गॅसवर भाजून घ्या.

३. बटाट्याची भाजी करण्याकरता दोन बटाटे मॅश करून घ्या. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाका.

४. तेल गरम झालं की गॅस मंद आचेवर ठेवून त्यात लाल मिरची पावडर,मीठ व शेंगदाण्याचं कूट घालून नंतर बटाटे टाका.आपल्याला जेवढं पातळ हवा असेल तेवढं पाणी टाकून एक उकळी येऊ द्या.

हेही वाचा >> सर्वांच्या आवडीची लग्नामध्ये पंगतीत वाढली जाणारी झणझणीत फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी; ही घ्या रेसिपी

५. गँस बंद करून गरम गरम सर्व्ह करा.