Viral Video : पाणी पुरी हा शब्द जरी ऐकला तरी तोंडाला पाणी सुटते. पाणी पुरी गोल गप्पे, पुचका, गुप चूप, इत्यादी अनेक नावाने ओळखली जाते. तुम्ही पाणी पुरीचे अनेक प्रकार ऐकले असतील किंवा खाल्ले असतील पण तुम्ही कधी सोन्या चांदीची पाणी पुरी खाल्ली आहे का? तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोन्या चांदीची पाणी पुरी कशी असेल? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

गुजरात येथील अहमदाबादच्या एका विक्रेत्याने पाणी पुरीचे नवीन व्हर्जन शोधून काढले आहे. या पाणीपुरीमध्ये सुका मेव आणि थंडाईचा समावेश केला जातो आणि ही पाणी पुरी सोनेरी प्लेटमध्ये पाणी पुरीवर सोने चांदीच्या कोटींग करून सर्व्ह केली जाते. सध्या या पाणीपुरीची सगळीकडे चर्चा सुरू आहे. काही लोकांनी या क्रिएटिव्हीटीचे कौतुक केले आहे तर काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Make this easy and tasty Mango-Rawa Cake recipe
मँगो-रवा केकची सोपी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा; नोट करा साहित्य अन् कृती
Jugaad Video
Jugaad Video : फक्त एका कांद्याच्या मदतीने घरातील डास पळवा, पाहा हा सोपा जुगाड; व्हिडीओ होतोय व्हायरल
Gavran Kharda Mandeli Recipe In Marathi
गावरान खर्डा मांदेली; अलिबाग स्पेशल रेसिपी एकदा खाल तर खातच रहाल, लगेच नोट करा
Breakfast Recipe
फक्त एक वाटी गव्हाचे पीठ आणि दोन कांद्यांपासून बनवा झटपट असा टेस्टी नाश्ता, लगेच रेसिपी जाणून घ्या
Fresh vs pre-shaved coconut water
ताजे की पॅकबंद? कोणते नारळ पाणी आरोग्यासाठी चांगले? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
Tiger rani Glimpses in Tadoba Andhari Tiger Project Nagpur
मध्य चांदाची “राणी” कोण? तिच्या राजेशाही थाटाचा सोहोळा एकदा अनुभवाच…
Moong dal samosa recipe
घरात सर्वांना नक्की आवडतील मूग डाळीचे हेल्दी समोसे; नोट करा ‘ही’ हटके रेसिपी
documentary review A Journey of Self-Discovery
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आत्मशोधाचा प्रवास…

हेही वाचा : Video: यापेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही! नवजात बाळानं आईला मारली मिठी अन् क्षणात

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की व्लॉगर्स खूशबू आणि मनन आपल्याला या नवीन पाणी पुरी विषयी माहिती देतात. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे – पाणी पुरीमध्ये बदाम, काजू आणि पिस्ता टाकताना दिसत आहे. त्यानंतर त्यात मध सुद्धा टाकताना दिसतात. शेवटी ग्लासमध्ये थंडाई टाकतात आणि प्रत्येक पाणी पुरीला सोन्या चांदीची कोंटीग करतात आणि ही पाणी पुरी सोनेरी ताटात सर्व्ह केली जाते. शेअरइट असे या पाणी पुरीच्या गाड्याचे नाव आहे. सध्या या पाणी पुरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

व्लॉगर्स खूशबू आणि मनन यांनी त्यांच्या cherishing_the_taste_ या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सोने-चांदीची पाणी पुरी! शेअरइट ही देशातील पहिली स्वच्छ लाइव्ह फ्राइड पाणी पुरी आहे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्ही दहा रुपयांमध्ये चार पाणी पुरी खाणारे लोक आहोत. तर एका युजरने लिहिलेय, “याला बप्पी लहरी पाणी पुरी म्हणा” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा, किंमत पण सांग” अनेक युजर्सना पाणी पुरीचा हा प्रकार आवडला नाही. त्यामुळे अनेकांनी व्हिडीओ पाहून टिका सुद्धा केली आहे