Vegetable lollipops Recipes: उन्हाळ्याच्या दिवसात मुलांसाठी दररोज काय बनवायचं, हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. नवीन पदार्थासोबतच मुलांसाठी तो पौष्टिक असणंदेखील खूप गरेजचं आहे. अशावेळी तुम्ही व्हेजीटेबल लॉलीपॉप ट्राय करू शकता. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि टेस्टी आहे. चला तर जाणून घेऊया साहित्य आणि कृती…
व्हेजीटेबल लॉलीपॉप बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१. ३-४ उकडलेले बटाटे
२. २ उकडलेले रताळे
३. २ वाटी मटार
४. १ वाटी गाजर
५. १ तुकडा आलं
६. ४-५ हिरवी मिरची
७. लाल तिखट चवीनुसार
८. गरम मसाला चवीनुसार
९. १ चमचा चाट मसाला
१०. ब्रेडक्रंब्स
११. चवीनुसार मीठ
१२. कोथिंबीर
१३. तेल आवश्यकतेनुसार
व्हेजीटेबल लॉलीपॉप बनवण्यासाठी कृती :
हेही वाचा: सतत कैरीचे लोणचे खाऊन कंटाळा आलाय? मग बनवा खजुराचे टेस्टी लोणचे; नोट करा साहित्य अन् कृती
१. सर्वात आधी आलं बारीक कापून घ्यावे आणि त्यात हिरवी मिरची थोडे मीठ घालून वाटून घ्यावे.
२. त्यानंतर गाजर किसून घ्या आणि मटारही मिक्सरमधून वाटून घ्या.
३. आता फ्राय पॅनमध्ये तेल घालून आल्याची पेस्ट, मिरची पेस्ट, गाजराचा किस, मटार पेस्ट, उकडलेले बटाटे कुस्करून, उकडलेले रताळे कुस्करून, थोडे मीठ घालून हे सर्व मिश्रण परतून घ्या.
४. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम मसाला, तिखट, चाट मसाला, मीठ घालून मिसळून त्याचे बारीक गोळे करुन घ्या आणि ब्रेडक्रंब्ससह कोट करा.
५. नंतर हे लॉलीपॉप गरम तेलात तळून घ्या.
६. तयार गरमागरम व्हेजीटेबल लॉलीपॉप सॉससोबत सर्व्ह करा.