विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. विदर्भ म्हटलं की सावजी हे नाव हमखास येतच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे.. “विदर्भ स्पेशल डाळकांदा”….बऱ्याच ठिकाणी त्याची सुद्धा एक वेगळीच टेस्ट असते.शेवटी काय पदार्थ एकच असला तरी बनविणारी हात वेगवेगळे आणि प्रत्येकाचा पदार्थ, आवडी-निवडी ह्या वेगवेगळ्या असणारच. आणि असायलाच हव्यात.. नाही का..? चला तर मग पाहुयात सावजी चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास विदर्भ स्पेशल डाळकांदा

विदर्भ स्पेशल डाळकांदा साहित्य

  • १ लहान वाटी हरभरा डाळ
  • १ मोठा कांदा
  • ५-६ लसूण पाकळ्या, आल्याचा एक तुकडा
  • २ तमालपत्रे,
  • ४ लवंग,
  • २ मिरे
  • १ चमचा लाल तिखट
  • १ चमचा काळ मसाला
  • १/२ चमचा गरम मसाला
  • १/२ चमचा प्रत्येकी धना, जिरा पावडर
  • फोडणीसाठी
  • हिंग, जीरे , हळद
  • चवीनुसार मीठ
  • थोडी कोथिंबीर

विदर्भ स्पेशल डाळकांदा कृती

स्टेप १
प्रथम हरभरा डाळ ५-६ तास कोमट पाण्यात भिजत ठेवावे. कांदा, कोथिंबीर चिरून घ्यावे. सर्व मसाले काढून घ्यावेत.

स्टेप २
आता कढईत ३-४ पळ्या तेल गरम करून त्यामध्ये हिंग, जीरे,तमालपत्र,लवंग, मिरे घालावे तडतडले की कांदा घालावा, मीठ घालावे.(मीठामुळे कांदा लवकर भाजतो.)

स्टेप ३
कांदा मऊ झाला की त्यामध्ये लाल तिखट, काळा मसाला, धणे-जिरेपूड,गरम मसाला, हळद घालावे. एक मि. परतून घ्यावे.आता डाळ घालावी, झाकण ठेवून एक वाफ आणावी. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालावे व अर्धवट झाकून शिजू द्यावे.

हेही वाचा >> VIDEO: नवरदेवानं नाकारलं भटजींनी घ्यायला लावलेलं वचन! नवरी चिडली अन् पुढे झालं असं की…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टेप ४
मध्ये एक-दोनदा हलवावे. डाळ शिजली का ते पहावे, शिजली असल्यास गॅस बंद करावा. वरून कोथिंबीर घालावी. तयार आहे आपला चमचमीत विदर्भ स्टाइल डाळ कांदा. गरम गरम चपाती भातासोबत सर्व्ह करावा.