How To Cook Perfect Rice Video: महाराष्ट्रात प्रत्येक घरात निदान दिवसातून एकदा भात शिजतोच. ज्यांना पोळ्या खायला आवडतात त्यांनाही थोडा जोडीला का होईना पण भात लागतोच. अशावेळी जर भात दिसायला छान फडफडीत असेल तर खाण्याची अधिक इच्छा होते. कितीही हुशार व सवयीचा शेफ असला तरी कधी भातात पाणी कमी पडतं, कधी जास्त पडतं. त्यामुळे एकतर भाताचा नुसता लगदा होतो किंवा अगदीच अर्धा कच्चा भात राहतो. अशावेळी एक नेमका गोल्डन रुल असता तर बरं झालं असतं असं वाटतं ना? आज आपण फडफडीत भात शिजवण्याचे नामी उपाय पाहणार आहोत. परफेक्ट भात शिजवण्यासाठी आज एक दोन नव्हे तर चक्क १० टिप्स आम्ही आपल्यासह शेअर करत आहोत.

परफेक्ट भात शिजवण्याच्या सोप्या टिप्स

इंस्टाग्रामवर @sanjana.feasts या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या टिप्स पाहुयात..

  1. तुम्ही तांदूळ निवडतानाच नीट काळजी घ्यायला हवी. छोट्या दाण्याचा तांदूळ जसा की इंद्रायणी हा चिकटच असतो त्यामुळे तुम्हाला फडफडीत भात खायचा असेल तर तांदूळ नीट निवडा.
  2. तांदूळ धुताना थंड पाणी वापरा. यामुळे अतिरिक्त स्टार्च निघून जाते व भात फुलून येतो.
  3. कुकरला जास्त शिट्या दिल्याने भात चिकट होऊ शकतो, त्यामुळे आधी तांदूळ ३० मिनिट तरी भिजवून ठेवा ज्यामुळे तांदूळ आधीच मऊ होईल व दोन शिट्ट्यांमध्ये भात शिजून तयार होईल.
  4. शक्य असल्यास भात टोपात शिजवा. व अर्धा भात शिजल्यावर स्टार्चचे पाणी काढून टाका.
  5. मोठा टोप घ्या जेणेकरून भाताला फुलण्यासाठी जागा मिळेल.
  6. भात शिजत आल्यावर मीठ घाला जेणेकरून भात मुरण्याची प्रक्रिया नीट होईल.
  7. जर कधी बिर्याणी, पुलाव करणार असाल तर फोडणी ऐवजी भात शिजतानाच त्यात दालचिनी, वेलची, बडीशेप आणि लवंगा असे मसाले घालू शकता. यामुळे भात चिकटत नाही.
  8. भात उकळताना लिंबाचा तुकडा घालावा ज्यामुळे भात पांढराशुभ्र राहण्यास मदत होईल.
  9. सतत तांदूळ ढवळत राहू नका. एकदा- दोनदा चमचा फिरवल्यास पुरेसा ठरतो.
  10. भात वाढण्याआधी एकदा काट्याच्या चमच्याने नीट मोकळा करून घ्या.

हे ही वाचा<< Video: १५ मिनिटात तयार करा पोह्याचा जाळीदार दावणगिरी डोसा; पीठ आंबवण्याची कटकटच नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमच्याही अशाच काही खास टिप्स असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा!